TRENDING:

Cancer : कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात 'ही' 9 लक्षणं; या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच व्हा सावध

Last Updated:
आजच्या काळात 'कॅन्सर' हा शब्दच धडकी भरवणारा आहे. कॅन्सर हा हळूहळू एका महामारीसारखा पसरत चालला आहे. याचं सर्वात मोठं आणि भयावह कारण म्हणजे, या आजाराचं निदान खूप उशिरा होतं.
advertisement
1/14
कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात 'ही' 9 लक्षणं; दुर्लक्ष करु नका, वेळीच व्हा सावध
धावपळीचं आयुष्य, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल छोटी-मोठी आजारपणं पाचवीलाच पुजलेली असतात. कधी डोकं दुखतं, कधी थकवा जाणवतो, तर कधी पचनाचे त्रास होतात. आपण सहसा "कामाचा ताण असेल" किंवा "हवामान बदललं असेल" असं म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि एखादी साधी गोळी घेऊन काम भागवतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? कधीकधी शरीराने दिलेले हे अगदी साधे वाटणारे संकेत एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकतात.
advertisement
2/14
आजच्या काळात 'कॅन्सर' हा शब्दच धडकी भरवणारा आहे. कॅन्सर हा हळूहळू एका महामारीसारखा पसरत चालला आहे. याचं सर्वात मोठं आणि भयावह कारण म्हणजे, या आजाराचं निदान खूप उशिरा होतं. जेव्हा हा आजार शरीरात पूर्णपणे मुळं रुजवतो, तेव्हा कुठे आपल्याला त्याची जाणीव होते. पण, 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या संशोधनानुसार, कॅन्सर शरीरात प्रवेश करताच काही सुरुवातीचे संकेत देऊ लागतो. जर आपण वेळेत हे संकेत ओळखले, तर या जीवघेण्या आजाराला हरवणं शक्य आहे.
advertisement
3/14
शरीराचे 'हे' 9 संकेत नेहमी गांभीर्याने घ्या:
advertisement
4/14
1. वजनात अचानक घट आणि भूक न लागणे:जर तुमचं वजन कोणत्याही व्यायामाशिवाय किंवा डाएटशिवाय अचानक कमी होऊ लागलं असेल, तर ते धोक्याचं लक्षण आहे. भूक मंदावणे आणि सतत अशक्तपणा जाणवणे हे शरीरातील अंतर्गत बिघाडाचे पहिले संकेत असू शकतात.
advertisement
5/14
2. पचनाच्या आणि शौचाच्या सवयींत बदल:गेल्या काही वर्षांत कोलन कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. शौचाच्या वेळी काळ्या रंगाची विष्ठा होणे किंवा शौचातून रक्त पडणे याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे आतड्यांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
advertisement
6/14
3. त्वचेवरील बदल:तुमच्या त्वचेवर अचानक एखादा डाग पडणे, तीळ किंवा चामखीळ यांच्या आकारात आणि रंगात बदल होणे किंवा त्वचेचा एखादा भाग निळा पडणे हे 'मेलेनोमा' सारख्या त्वचा कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
advertisement
7/14
4. लिम्फोमाचे संकेत (ताप आणि घाम):रात्री झोपताना प्रचंड घाम येणे, सतत येणारा ताप, थंडी वाजणे किंवा शरीरावर कुठेही गाठ किंवा सूज येणे हे लिम्फोमाचे लक्षण असू शकते, जो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो.
advertisement
8/14
5. सततची हाडदुखी:हाडांमध्ये सतत ठणका लागणे किंवा शरीराच्या एखाद्या भागात विचित्र अस्वस्थता जाणवणे हे 'सार्कोमा' नावाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
advertisement
9/14
6. डोकेदुखी आणि दृष्टीदोष:सतत होणारं तीव्र डोकेदुखी किंवा दृष्टीमध्ये अचानक होणारा बदल हे मेंदू किंवा मणक्याच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.
advertisement
10/14
7. लघवीवाटे रक्त येणे:लघवीतून रक्त येणे हे किडनी किंवा मूत्राशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. महिलांच्या बाबतीत, मासिक पाळीच्या व्यतिरिक्त किंवा शरीरसंबंधानंतर रक्तस्त्राव होणे हे गर्भाशयाच्या (Cervical) कॅन्सरचे लक्षण असू शकते.
advertisement
11/14
8. रक्ताच्या कर्करोगाचे (Leukemia) संकेत:कारण नसताना शरीरावर निळे डाग पडणे, वारंवार इन्फेक्शन होणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे हे रक्ताच्या कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
advertisement
12/14
9. कधीही न भरणारी जखम:शरीरावर झालेली एखादी जखम किंवा फोड बराच काळ औषधोपचार करूनही बरा होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
13/14
वरीलपैकी कोणतंही लक्षण दिसलं म्हणजे तुम्हाला कॅन्सरच आहे असा त्याचा अर्थ होत नाही, पण ही लक्षणं धोक्याची घंटा असू शकतात. कॅन्सरच्या बाबतीत 'वेळेवर निदान' हाच सर्वात मोठा उपचार आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आणि संशयास्पद लक्षणं आढळल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
advertisement
14/14
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer : कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात 'ही' 9 लक्षणं; या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच व्हा सावध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल