TRENDING:

रिलीजच्या एक दिवस आधीच The Kerala Story 2 ला हायकोर्टाचा दणका! केली सेन्सॉर बोर्डाची कानउघडणी; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
The Kerala Story 2: २७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेल्या 'द केरला स्टोरी २ – गोज बियॉन्ड' या चित्रपटाला केरळ हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.
advertisement
1/8
रिलीजच्या एक दिवस आधीच The Kerala Story 2 ला हायकोर्टाचा दणका!
उद्या, २७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेल्या 'द केरला स्टोरी २ – गोज बियॉन्ड' (The Kerala Story 2) या चित्रपटाला केरळ हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.
advertisement
2/8
प्रदर्शनाच्या अवघ्या एक दिवस आधी न्यायालयाने या चित्रपटावर अंतरिम स्थगिती आणली असून, यामुळे चित्रपट निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत.
advertisement
3/8
सेन्सॉर बोर्डाने दिलेले क्लिअरन्स सर्टिफिकेट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने आता या सिनेमाचा पुढचा प्रवास कायदेशीर कचाट्यात अडकला आहे.
advertisement
4/8
हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
advertisement
5/8
न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की, "हा चित्रपट प्रमाणित करताना सेन्सॉर बोर्डाने आपला सारासार विचार वापरलेला दिसत नाहीये." सामाजिक सलोखा राखण्यासाठी जे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक अंदाज न्यायालयाने व्यक्त केला आणि पुढच्या आदेशापर्यंत प्रदर्शनावर बंदी घातली.
advertisement
6/8
'द केरला स्टोरी २' च्या पहिल्या भागाने संपूर्ण देशात वादळ निर्माण केलं होतं. आता या दुसऱ्या भागात केरळसह राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कथित धर्मांतर आणि बळजबरीच्या प्रकरणांवर भाष्य करण्यात आलं आहे.
advertisement
7/8
मात्र, याचिकाकर्त्यांचा असा आरोप आहे की, हा चित्रपट केरळची चुकीची प्रतिमा मांडतो आणि यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. गेल्याच आठवड्यात चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'U/A' प्रमाणपत्र दिलं होतं, पण कोर्टाने आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
advertisement
8/8
विपुल अमृतलाल शाह यांच्या 'सनशाईन पिक्चर्स' अंतर्गत निर्माण झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केलं आहे. यात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रिलीजच्या एक दिवस आधीच The Kerala Story 2 ला हायकोर्टाचा दणका! केली सेन्सॉर बोर्डाची कानउघडणी; नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल