सॅमसंगचे सीईओ टीएम रोह म्हणाले की Galaxy S26 लाइनअप हा जगातील पहिला "एजंटिएंट AI फोन" आहे. ते म्हणाले, "अशा फोनची कल्पना करा जो तुमच्या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच ओळखतो. असा फोन जो तुमच्या सवयी शिकतो आणि रिअल-टाइममध्ये जुळवून घेतो. असा फोन जो तुमच्या वतीने काम देखील करू शकतो."
शेजारच्याला स्क्रिनही दिसणार नाही
advertisement
Galaxy S26 Ultra मध्ये नवीन 'प्रायव्हसी डिस्प्ले' टेक्नॉलॉजी दिली आहे. जी फोनच्या मालका व्यतिरिक्त इतराना स्क्रिनच्या खास भागांना काळे करते. याचा अर्थ असा की, कोणी तुमच्या शेजारी उभा असेल तर त्याला तुमच्या फोनमधील काहीच दिसणार नाही. त्याला स्क्रिन काळी दिसेल. स्क्रिन फक्त तुम्हालाच दिसेल.
Whatsapp मध्ये 1 मार्चपासून होणार मोठा बदल! आताच बघा अन्यथा होईल बंद
विक्री 11 मार्चपासून सुरू होईल
Galaxy S26 सीरीज तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: S26, S26 Plus आणि S26 Ultra. कंपनीने बुधवारी प्री-ऑर्डर सुरू केल्या आणि 11 मार्चपासून ही उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध होतील. S26 आणि S26 Plusची किंमत 100 डॉलरने वाढवण्यात आली आहे.
दोन नवीन ईयरबड्स Galaxy Buds 4 आणि Buds 4 Pro ही लॉन्च
Galaxy S26 सीरीज व्यतिरिक्त सॅमसंगने दोन नवीन ईयरबड्स Galaxy Buds 4 आणि Buds 4 Pro ही लॉन्च केले आहेत. ज्यांना एक नवीन फोनसह सहज पेयर केलं जाऊ शकेल.
Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत
12GB + 256GB – 1,39,999 रुपये
12GB + 512GB – 1,59,999 रुपये
16GB + 1TB – 1,89,999 रुपये
Samsung Galaxy S26+ ची किंमत
12GB + 256GB – 1,19,999 रुपये
12GB + 512GB – 1,39,999 रुपये
Samsung Galaxy S26 ची किंमत
12GB + 256GB – 87,999 रुपये
12GB + 512GB – 1,07,999 रुपये
Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro ची किंमत
Galaxy Buds 4 Pro – 22,999 रुपये
Galaxy Buds 4 – 16,999 रुपये
Spam Calls पासून बचाव करायचाय? WhatsAppच्या या सेटिंग करा ऑन
Samsung Galaxy S26 Ultra लाँच होण्यापूर्वी दुबईमध्ये विक्रीसाठी होता
Galaxy S26 सिरीज लाँच होण्यापूर्वीच, YouTuber Sahil Karaul Sahil ने एक धक्कादायक दावा केला होता. एका दुकानाचा फोटो शेअर करताना, साहिलने दावा केला की त्याने तो आधीच स्टॉक केला होता आणि फोन आधीच विक्रीसाठी होता. अलीकडेच, साहिलने दुबईमध्ये Samsung Galaxy S26 Ultra खरेदी केला आणि जगाला दाखवण्यासाठी तो अनबॉक्स केला होता.
