TRENDING:

Mumbai Food : स्वस्तात मस्त फूड, 60 रुपयांपासून मिळतायंत चिकन नगेट्स, मुंबईतलं हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:
खाओमोर हा नवा फूड स्पॉट नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. परवडणाऱ्या दरात विविध प्रकारचे चवदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेमुळे खाओमोरने परिसरातील खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
1/5
स्वस्तात फूड, 60 रुपयांपासून मिळतायंत चिकन नगेट्स,मुंबईतलं हे ठिकाण माहितीये का?
अनेकांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. मुंबईतील लालबागमधील गणेशगल्लीतील खाओमोर हा नवा फूड स्पॉट नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. परवडणाऱ्या दरात विविध प्रकारचे चवदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेमुळे खाओमोरने परिसरातील खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
2/5
सध्याच्या महागाईच्या काळात कमी किमतीत चांगल्या दर्जाचे फूड मिळणे कठीण झाले असताना खाओमोरने परवडणाऱ्या दरात फूड सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे भेट देताना दिसत आहे. संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते.
advertisement
3/5
या ठिकाणी मोमोज, बर्गर, पिझ्झा, फ्राइज, चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न बॉल्स तसेच विविध स्नॅक्स उपलब्ध आहेत. ज्यात मोमोज हाफ प्लेट 60 रुपये तर फुल प्लेट 90 रुपयांना दिले जात आहेत. चिकन पॉपकॉर्न बॉल्स (15 पीस) अवघ्या 120 रुपयांना मिळत असून फ्राइजचे दर 100 ते 170 रुपयांपर्यंत आहेत.
advertisement
4/5
पिझ्झा केवळ 110 रुपयांपासून उपलब्ध असून चिकन सबवे 150 ते 200 रुपयांपर्यंत, तर वेज डिलाइट 140 ते 200 रुपयांपर्यंत दिले जात आहे. कमी वेळेत ऑर्डर मिळणे आणि चवीत सातत्य राखले जाणे यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत आहे.
advertisement
5/5
कमी किमतीत विविध पदार्थांची उपलब्धता आणि दर्जेदार सेवेमुळे खाओमोर हा लालबाग परिसरातील नव्या पिढीचा आवडता फूड स्पॉट बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Mumbai Food : स्वस्तात मस्त फूड, 60 रुपयांपासून मिळतायंत चिकन नगेट्स, मुंबईतलं हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल