TRENDING:

कोण आहे विजय देवरकोंडाची मेव्हणी? रश्मिका मंदानापेक्षा तब्बल 16 वर्ष लहान, लाइमपासून दूर राहून करते 'हे' काम

Last Updated:
Who is Rashmika Mandanna Sister: रश्मिकाच्या कुटुंबातील एका अशा व्यक्तीची चर्चा रंगली आहे, जी ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर आहे. ही व्यक्ती म्हणजे रश्मिकाची धाकटी बहीण शिमन मंदाना.
advertisement
1/8
कोण आहे विजय देवरकोंडाची मेव्हणी? रश्मिका मंदानापेक्षा तब्बल 16 वर्ष लहान
उदयपूरच्या शाही महालात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आज रेशीमगाठीत अडकले आहेत. सोशल मीडियावर या लग्नाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला असतानाच, रश्मिकाच्या कुटुंबातील एका अशा व्यक्तीची चर्चा रंगली आहे, जी ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर आहे. ही व्यक्ती म्हणजे रश्मिकाची धाकटी बहीण शिमन मंदाना.
advertisement
2/8
रश्मिका आणि शिमन यांच्यातील सर्वात अनोखी गोष्ट त्यांच्या वयातील अंतर. शिमन ही रश्मिकापेक्षा तब्बल १६ वर्षांनी लहान आहे. रश्मिका आज २९ वर्षांची आहे, तर शिमन अवघ्या १४ वर्षांची शाळकरी मुलगी आहे.
advertisement
3/8
रश्मिका अनेकदा मुलाखतींमध्ये सांगते की, "शिमन ही माझ्यासाठी माझी छोटी बहीण नाही, तर ती माझ्या मुलीसारखीच आहे." तिच्याबद्दल बोलताना रश्मिकाच्या डोळ्यांत नेहमीच एक वेगळी चमक दिसते.
advertisement
4/8
रश्मिका आज 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते, पण या यशासाठी तिला एका मोठ्या गोष्टीचा त्याग करावा लागला. गेल्या वर्षी एका मुलाखतीत रश्मिकाने आपलं मन मोकळं केलं होतं.
advertisement
5/8
ती म्हणाली होती, "गेल्या ८ वर्षांत मी माझ्या कामात इतकी व्यग्र राहिले की, माझ्या डोळ्यांदेखत माझी छोटी बहीण मोठी होताना मी पाहूच शकले नाही. जेव्हा मी घरी जाते आणि ती माझ्या खांद्याला लागेल इतकी उंच झालेली पाहते, तेव्हा माझ्या काळजात चर्र होतं. तिच्या बालपणातील महत्त्वाच्या क्षणांचा मी हिस्सा बनू शकले नाही, याची रुखरुख मला कायम राहील."
advertisement
6/8
रश्मिकाचे वडील, मदन मंदाना, कर्नाटकच्या कूर्ग भागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे स्वतःचे कॉफीचे मळे आणि एक आलिशान फंक्शन हॉल आहे. तर आई सुमन या गृहिणी असून रश्मिकाच्या प्रत्येक संघर्षात त्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
advertisement
7/8
सामान्यतः स्टार्सची भावंडं कॅमेऱ्यासमोर यायला उत्सुक असतात, पण मंदाना कुटुंबाने शिमनला या झगमगाटापासून लांब ठेवलंय. तिला एक सामान्य बालपण मिळावं आणि रश्मिकाच्या लोकप्रियतेचं ओझं तिच्या अभ्यासावर पडू नये, याची काळजी तिचे आई-वडील घेतात.
advertisement
8/8
विजय देवरकोंडासोबत शिमनचं बॉण्डिंगही खूप छान असल्याचं बोललं जातं. रश्मिकाची आई सुमन आपल्या लेकीला वधुवेषात पाहून आज भावूक झाल्या आहेत. या शाही लग्नामुळे मंदाना कुटुंबातील ही छोटा पॅकेट असलेली शिमन आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे विजय देवरकोंडाची मेव्हणी? रश्मिका मंदानापेक्षा तब्बल 16 वर्ष लहान, लाइमपासून दूर राहून करते 'हे' काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल