'गेममध्ये टिकण्यासाठी आता...', रोशन भजनकरचा खेळ पाहून पत्नी सीमाने दिली रिॲक्शन, टोळीच्या वागणुकीवर संतापली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
BBM6 Roshan Bhajankar: रोशनची पत्नी सीमा भजनकर यांनी पतीच्या खेळावर आणि घरातील सदस्यांच्या वागणुकीवर आपलं मौन सोडलं असून, 'टोळी' ग्रुपच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
advertisement
1/8

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सध्या खेळापेक्षा नात्यांची आणि गटातटांची चर्चा जास्त रंगतेय. या घरात असा एक सदस्य आहे, ज्याने आपल्या साध्या स्वभावाने अख्ख्या महाराष्ट्राचं काळीज जिंकलंय, तो म्हणजे रोशन भजनकर.
advertisement
2/8
पण, हाच साधेपणा आता रोशनसाठी अडथळा ठरू लागलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर रोशनची पत्नी सीमा भजनकर यांनी पतीच्या खेळावर आणि घरातील सदस्यांच्या वागणुकीवर आपलं मौन सोडलं असून, 'टोळी' ग्रुपच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
advertisement
3/8
घरामध्ये तन्वी कोलते आणि राखी सावंत यांनी रोशनला उद्देशून 'हमाल' हा शब्द वापरला होता. यावरून सीमा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/8
त्या म्हणतात, "मला खूप वाईट वाटलं. ते दहावीपासून हमालकी करत आहेत, मेहनत करून इथपर्यंत पोहोचले. त्यांचं नाव रोशन आहे, मग त्यांना नावानेच बोलवावं. हमाल म्हणून हिणवणं चुकीचं आहे. मेहनतीचा अपमान करू नका." रोशनच्या संघर्षाबद्दल अभिमान व्यक्त करताना सीमा यांचे डोळे पाणावले होते.
advertisement
5/8
बिग बॉसच्या घरात सध्या विशाल कोटियनच्या 'टोळी' ग्रुपचा दबदबा आहे. पण रोशन या टोळीत फक्त इतरांच्या इशाऱ्यावर नाचतोय का?
advertisement
6/8
यावर सीमा स्पष्टपणे म्हणाल्या, "हो, मलाही तसंच वाटतंय. रोशन खूप साधा आहे, कोणीही गोड बोललं की तो लगेच विश्वास ठेवतो. तो सध्या विशालच्या सांगण्यानुसार वागतोय, पण त्याने स्वतःचं डोकं चालवायला हवं. विशालच्या बोलण्यात न येता त्याने स्वतःचा स्वतंत्र गेम खेळला पाहिजे."
advertisement
7/8
बिग बॉसने रोशनला 'चुगली' दाखवून स्वतःचा स्टँड घेण्याची मोठी संधी दिली होती. मात्र, तिथेही रोशनने माघार घेतली. याबद्दल खंत व्यक्त करताना सीमा म्हणाल्या, "त्याने त्या संधीचं सोनं करायला हवं होतं. लोक पाठीमागे तुमच्याबद्दल काय बोलतात हे समजल्यावर तरी त्याने सावध व्हायला हवं होतं. तो खूप प्रामाणिकपणे खेळतोय, पण गेममध्ये टिकण्यासाठी आता त्याला आवाज चढवून बोलावं लागेल."
advertisement
8/8
रोशनला दर आठवड्याला नॉमिनेट केलं जातं, याबद्दलही सीमा यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "रोशनला इतरांसारखी फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही किंवा मुद्दे मांडताना तो थोडा कमी पडतो, हे मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याला दरवेळी सॉफ्ट टार्गेट बनवून नॉमिनेट करावं. त्याने आता तन्वी किंवा इतर सदस्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'गेममध्ये टिकण्यासाठी आता...', रोशन भजनकरचा खेळ पाहून पत्नी सीमाने दिली रिॲक्शन, टोळीच्या वागणुकीवर संतापली