TRENDING:

सलीम यांच्यासोबत गुपचूप अफेअर, सलमान खानच्या आईला पाहून लपायची हेलन, लग्नानंतर कसं होतं दोघींचं नातं?

Last Updated:
Helen-Salim Khan Lovestory: आज हेलेन या खान कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा सलीम खान यांच्या पहिल्या पत्नीला, म्हणजेच सलमा खान यांना समोर पाहिलं तरी हेलेन यांची बोबडी वळायची.
advertisement
1/8
सलीम यांच्यासोबत गुपचूप अफेअर, सलमान खानच्या आईला पाहून लपायची हेलन
बॉलीवूडमधील प्रेम आणि नात्यांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण सलीम खान आणि हेलेन यांची प्रेमकथा ही केवळ एका अफेअरची गोष्ट नाही, तर ती आहे आदर, संयम आणि एका मोठ्या कुटुंबाच्या विणलेल्या नात्याची. आज हेलेन या खान कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा सलीम खान यांच्या पहिल्या पत्नीला, म्हणजेच सलमा खान यांना समोर पाहिलं तरी हेलेन यांची बोबडी वळायची.
advertisement
2/8
सलीम खान आणि हेलेन यांची पहिली भेट १९६३ मध्ये 'कबली खान' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी हेलेन मुख्य नायिका होत्या आणि सलीम खान खलनायकाची भूमिका साकारत होते.
advertisement
3/8
विशेष म्हणजे, तेव्हा हेलेन यांनी सलीम खान यांच्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नव्हते. मात्र, तीन वर्षांनंतर १९६६ मध्ये 'तीसरी मंजिल' चित्रपट पाहताना हेलेन यांची नजर सलीम खान यांच्यावर स्थिरावली आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीचा श्रीगणेशा झाला.
advertisement
4/8
अरबाज खानच्या 'द इनव्हिंसिबल्स' या शोमध्ये हेलेन यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलेला एक किस्सा आजही अनेकांना थक्क करतो.
advertisement
5/8
हेलेन म्हणाल्या, "जेव्हा माझं आणि सलीम साहेबांचं प्रेम बहरत होतं, तेव्हा आम्ही अनेकदा बांद्रा बँडस्टँडवरून कारने फिरायला जायचो. पण जर चुकून सलमाजी बाल्कनीमध्ये उभ्या असल्याचं मला दिसलं, तर मी लगेच कारच्या सीटखाली वाकून लपायचे. मला वाटायचं की त्यांना मी दिसू नये आणि त्यांना वाईट वाटू नये. त्यांना वाटावं की सलीम साहेबांची गाडी रिकामीच आहे."
advertisement
6/8
हा लपंडाव भीतीपोटी नव्हता, तर तो सलमा खान यांच्याबद्दल असलेल्या अफाट आदरापोटी होता. हेलेन यांना कधीच असं वाटलं नाही की त्यांच्यामुळे सलीम खान यांचं हसतं-खेळतं घर मोडावं.
advertisement
7/8
सलीम खान यांना हे नातं लपवून ठेवणं मान्य नव्हतं. लोकांना हा केवळ एक अफेअर वाटू नये, म्हणून त्यांनी १९८० मध्ये हेलेन यांच्याशी निकाह केला. अर्थात, सुरुवातीला खान कुटुंबात या लग्नामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. सलमा खान आणि मुलांसाठी हा काळ कठीण होता, पण हेलेन यांचा प्रेमळ स्वभाव आणि सलीम खान यांचा खंबीरपणा यामुळे काळानुसार सगळं निवळलं.
advertisement
8/8
सलीम आणि हेलेन यांनी लग्नानंतर अर्पिता या मुलीला दत्तक घेतलं. आज सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा हे चौघेही हेलेन यांना आई मानतात आणि त्यांचा तितकाच आदर करतात. सलमा खान आणि हेलेन या सवतींमधील नातं आज एखाद्या मैत्रिणीसारखं आहे. एकाच छताखाली दोन पत्नी आणि मुलांचं हे गोकुळ आजही बॉलीवूडसाठी एक आदर्श उदाहरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलीम यांच्यासोबत गुपचूप अफेअर, सलमान खानच्या आईला पाहून लपायची हेलन, लग्नानंतर कसं होतं दोघींचं नातं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल