TRENDING:

मराठी भाषा दिवस विशेष : मराठी शिकवणाऱ्या पुणेकर जैन समाजाच्या भावनाताई! पुणेच नाही, जगातील 400 जणांना शिकवला 'म' मराठीचा!

Last Updated:

मराठी भाषा देश-विदेशात पोहोचवण्याचे काम पुण्यातील भावना संचेती गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पुणे : मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती विविध स्तरांवर कार्यरत आहेत. मात्र, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून मराठी भाषा देश-विदेशात पोहोचवण्याचे काम पुण्यातील जैन समाजाच्या भावना संचेती गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने करत आहेत. ‘म मराठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत 400 हून अधिक अमराठी नागरिकांना मराठी भाषा शिकवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
advertisement

पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी माध्यम क्षेत्रात काम केले. या काळात विविध स्तरांवरील लोकांशी संवाद साधताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. अनेकांना मराठी शिकायची इच्छा आहे. मात्र, योग्य माध्यम किंवा मार्गदर्शन उपलब्ध नाही. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये काम करताना त्यांना भाषेचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. त्यांच्या घरी हिंदी आणि मारवाडी भाषा बोलली जात असल्याने त्या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे विविध भाषिक पार्श्वभूमीच्या लोकांशी सहज संवाद साधणे त्यांना शक्य झाले.

advertisement

Video: होळीला ग्रहण, मग कधी आणि कशी साजरी करायची होळी? कल्याणच्या गुरुजींनी सांगितली योग्य वेळ

याच अनुभवातून 2022 साली त्यांनी ‘म मराठी’ या नावाने मराठी भाषा शिकवण्याचा अभ्यासक्रम सुरू केला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या कुटुंबात परिवर्तित झाला आहे. बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी, विविध कंपन्यांमध्ये कार्यरत अधिकारी, तसेच हौशीने भाषा शिकू इच्छिणारे नागरिक असे विविध विद्यार्थी त्यांच्या वर्गात सहभागी झाले आहेत. कामाच्या ठिकाणी संवादासाठी मराठीची आवश्यकता भासणारे अनेक जण त्यांच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेत आहेत.

advertisement

View More

विशेष म्हणजे, त्यांच्या वर्गात वयाची कोणतीही अट नाही. चार-पाच वर्षांच्या बालकांपासून ते 81 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मराठी शिकत आहेत. भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाइन वर्गांद्वारे मराठी आत्मसात केली आहे. महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या कुटुंबांनाही आपल्या मुलांना मातृभाषेची ओळख व्हावी, त्यांना संस्कृतीशी जोडले जावे, अशी इच्छा असते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, टर्की, जर्मनी अशा अनेक देशांतील विद्यार्थी सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शिकत आहेत. भावना संचेती या पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेतात. डिजिटल युगाचा योग्य उपयोग करून त्यांनी मराठी शिकवण्याची पद्धत अधिक सोपी आणि आकर्षक केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अचानक आकाशातून परदेशी पाहुणा आला गावात, भोरमध्ये उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?
सर्व पहा

मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती, परंपरा आणि ओळखीचा भाग आहे. या भावनेतून भावना संचेती सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषा देशाच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवर पोहोचत आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून मराठीचा गोडवा जगभर पोहोचवण्याचे त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मराठी भाषा दिवस विशेष : मराठी शिकवणाऱ्या पुणेकर जैन समाजाच्या भावनाताई! पुणेच नाही, जगातील 400 जणांना शिकवला 'म' मराठीचा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल