advertisement

अजित पवारांच्या अपघात प्रकरणात महत्त्वाचे पुरावे, CID च्या हाताला काय काय लागलं? सुनील रामानंद यांनी सगळं सांगितलं

Last Updated:

CID Press Conference Regarding Ajit Pawar Plane Crash Accident: अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने तपासाची सूत्रे हातात घेतलेल्या सीआयडीच्या हाताला काय काय लागले? याची माहिती देण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार अपघात प्रकरण
अजित पवार अपघात प्रकरण
पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग अर्थआत सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेल्या प्रकरणाबाबतीत आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तपास अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. अपघातामागे गुन्हेगारी कट आहे का? अकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का? अशा दिशेने तपास सुरू असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडून व्हावा, अशी मागणी पवार कुटुंबाने केली. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून सीआयडी चौकशीची शिफारस केली. त्यानंतर तपासाची सूत्रे हातात घेतलेल्या सीआयडीने आतापर्यंत काय काय केले? याची माहिती देण्यासाठी सीबीआयचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

गुन्ह्यामागे घातपात असल्याचे पुढे आले तर....

advertisement
अजित पवार यांच्या अकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का? हा तपासाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत अपघातामागे गुन्हेगारी कट आहे का? अशा दिशेने तपास सुरू आहे. गेल्या २८ दिवसांपासून आम्ही तपास करीत आहोत. यामध्ये आमच्या हाताला काही महत्त्वाच्या गोष्टी लागलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तपास सुरू आहे. AAIB यांच्याशी सातत्याने सीआयडीचा समन्वय असून गुन्ह्यामागे घातपात असल्याचे पुढे आले तर गुन्हा दाखल करून उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालविण्यासंबंधी पावली टाकली जातील, अशी महत्त्वाची माहिती सुनील रामानंद यांनी दिली.
advertisement

तपासात बरीच प्रगती, आमच्या हाताला महत्त्वाचे पुरावे लागले आहेत

जर या तपासात घातपात, षडयंत्र, किंवा तत्सम काही गोष्टी समोर आल्या तर त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. राज्य सरकारने या प्रकरणात तपास सीबीआयने ताब्यात घ्यावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. विमान कंपनीबाबत डीजीसीएच्या अहवालानुसार इतर एजन्सीचचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तपासात बरीच प्रगती आहे, वेगात तपास सुरू आहे. एएआयबीच्या तांत्रिक तपासाच्या अहवालाचाही समावेश या तपासात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या अपघात प्रकरणात महत्त्वाचे पुरावे, CID च्या हाताला काय काय लागलं? सुनील रामानंद यांनी सगळं सांगितलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement