advertisement

Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 10 गुंठ्यात केली वांग्याची लागवड, साडेतीन लाखांचा नफा!

Last Updated:
फक्त 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखों रुपयांचा नफा मिळणार आहे.
1/5
शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यामधून मोठ्या प्रमाणात त्यांना नफा मिळत असतो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यानेही असाच एक प्रयोग केला आहे.फक्त 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखों रुपयांचा नफा मिळणार आहे.
शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यामधून मोठ्या प्रमाणात त्यांना नफा मिळत असतो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यानेही असाच एक प्रयोग केला आहे. फक्त 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखों रुपयांचा नफा मिळणार आहे.
advertisement
2/5
सोलापूरमधील कोरवली गावातील या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर हिप्परकर आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले ज्ञानेश्वर हिप्परकर यांना एकूण चार एकर शेती आहे. प्रत्येक 10 गुंठ्यात वेगवेगळी पिके घेऊन त्यांनी उत्पन्न वाढवले आहे.

3/5
15 डिसेंबरला लागवड केलेल्या वांग्याच्या रोपासाठी त्यांना 10 गुंठ्यात फक्त 20 हजार रुपयांचा खर्च आला. यात 800 वांग्याच्या रोपांची लागवड केली आहे. या वांग्याच्या तोडणीला सुरुवात झाली असून पहिल्या तोडणीतच 80 हजार रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे.

4/5
आठ महिने चालणाऱ्या या तोडणीत एकूण खर्च वजा करून 3 ते 3.50 लाखांचा नफा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर बाजारऐवजी सोलापूर जिल्ह्यातील गावांतील आठवडी बाजारात विक्री करतात, ज्यामुळे दुप्पट नफा मिळतो.

5/5
ज्ञानेश्वर हिप्परकर सांगतात की, कमी क्षेत्रातही योग्य नियोजनाने शेती फायदेशीर होऊ शकते. सेंद्रिय पद्धतीमुळे रसायनांचा खर्च टाळला गेला आणि बाजारातील मागणी वाढली. शिक्षण कमी असले तरी शेतीचे ज्ञान आणि मेहनत महत्त्वाची. त्यांच्या यशाने स्थानिक शेतकरी उत्साहित झाले असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement