TRENDING:

Money Saving Tips : कमी सॅलरीमध्येही खर्च भागवून वाचतील पैसे! फक्त 'या' सवयी लावा, जमेल चांगली रक्कम

Last Updated:
Money Saving Tips In Marathi : प्रत्येकाला वाटतं आपले पैसे सेव्ह व्हावे. आपण कमी खर्च करावा किंवा अडीनडीला कमी येण्यासाठी आपल्याकडे चांगली अमाऊंट तयार असावी. मात्र पगार कमी असेल तर पैसे सेव्ह करण्याची इच्छा पूर्ण होत नाही. पण तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरल्या आणि काही सवयी बदलल्या तर तुमचे नक्कीच वाचू शकतात.
advertisement
1/7
कमी सॅलरीमध्येही खर्च भागवून वाचतील पैसे! फक्त 'या' सवयी लावा, जमेल चांगली रक्कम
आज आम्ही तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या सांगत आहोत. तुम्हाला पगार कमी असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. चला पाहूया.
advertisement
2/7
आधी बचत नंतर खर्च : बऱ्याच लोकांना सवय असते, आधी खराचाचे पैसे बाजूला कार्याचे आणि मग बचत करायची. पण तुम्ही या उलट करायला हवं. म्हणजे आधी बचत किती करायची आहे, ते पैसे बाजूला ठेवा, नंतर तुमचा खर्च उरलेल्या पैशांमध्ये भगवा. यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागेल, वायफळ खर्च टळेल आणि दर महिन्याला न चुकता पैसे बाजूला पडतील.
advertisement
3/7
खरेदीचा मोह कमी करा : प्रत्येक महिन्याला काही घ्यायची तुम्हाला सवय असेल तर ती कमी करा. काहीवेळा काही गोष्टी खरेदी करणं तुम्ही टाळू शकत असाल तर ते नक्की करा. म्हणजे घरात आधीच असलेल्या वस्तूंचा पुरेपूर वापर करा आणि अगदीच शक्य नसल्यास मगच वस्तू विकत घ्या.
advertisement
4/7
बजेट बनवा : जसे आपण आधीच बचतीचे पैसे बाजूला केले तसेच तुम्हाला नेमका किती खर्च लागतो आणि त्यातला कोणता खर्च टाळता येण्यासारखा आहे, ते तपासा. यासाठी बजेट बनवणं आवश्यक आहे. एकदा बजेट तयार केलं की त्याप्रमाणेच महिनाभर खर्च करा. बजेट काटेकोरपणे पाळा.
advertisement
5/7
24 तासांचा नियम : हा नियम तुमच्या अनावश्यक खरेदीवर यावर घालण्यासाठी बेस्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादी वस्तू इतकी आवडते की आपण तिची गरज नसतानाही ती खरेदी करतो. अशावेळी हा नियम फॉलो करा. आधी स्वतःला विचारला ही वस्तू मला खरंच हवी आहे का? त्या वास्तूशिवाय 24 तास राहून बघा. तुम्हाला 24 तास जर त्या वस्तूची गरज भासली नाही, म्हणजे तुम्हाला तिची गरक नाही. मग ती वस्तू खरेदी करणं टाळा.
advertisement
6/7
सबस्क्रिप्शन तपासा : तुम्ही कोणकोणते सबस्क्रिप्शन वापरता, ते सर्व तुम्हाला गरजेचे आहेत का ते तपासा. शिवाय तुम्ही कोणत्या अप्सला ऑटो-पे इनेबल केलं आहे तेही तपासा. या ऑटो-पेमुळे दर महिन्याला न चुकता तुमच्या अकाऊंटमधून पैसे जातात. त्यामुळे सर्व सबस्क्रिप्शनमधून ऑटो-पे काढून टाका.
advertisement
7/7
क्रेडिट कार्डचा वापर कमी करा : बरेच लोक क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. यामधून त्यांना रिवोर्ड पॉईंट्स मिळतात. पण प्रत्यक्षात क्रेडिट कार्डमधून तुम्ही जितका खर्च करता, तितके ते रिवोर्ड पॉईंट्स नसतात. शिवाय क्रेडिट कार्डमधून खर्च झालेले पैसे आपल्याला लगेच आपल्या खिशातून गेल्यासारखे वाटत नाही, म्हणून बऱ्यचहडा लोक जास्त खर्च करतात आणि त्याचा बोजा मग पुढच्या महिन्यावर पडतो. यामुळे त्या महिन्याचं बजेट कोलमडतं. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Money Saving Tips : कमी सॅलरीमध्येही खर्च भागवून वाचतील पैसे! फक्त 'या' सवयी लावा, जमेल चांगली रक्कम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल