TRENDING:

Mumbai Rain: मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, पावसाची विश्रांती, आज वेगळंच संकट

Last Updated:
Mumbai Rain: कोकणातील मान्सूनची तीव्रता कमी झाली असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज मुंबईसह ठाण्यातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, पावसाची विश्रांती, आज वेगळंच संकट
ऐन आषाढात दोन दिवस मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढल्यानंतर आज 18 जुलै रोजी कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. आकाश ढगाळ राहणार असून दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवणार आहे.
advertisement
2/5
मुंबईत गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र आज हवामानात काहीसा बदल झाला आहे. सकाळपासूनच आकाश ढगाळ असून, हलक्याफुलक्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर कालच्या तुलनेत कमी आहे. हवामान उष्ण आणि दमट असून, कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरातही 17 जुलै रोजी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. आज मात्र परिस्थिती काहीशी सामान्य आहे. ढगाळ हवामान आणि दमटपणा जाणवत असून, दुपारनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रकार घडले. आज हवामानात बदलले असून सकाळपासून रिमझिम सरी पडत आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर वाऱ्याचा वेग काहीसा जास्त असून, मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येथील कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 25 अंश राहील.
advertisement
5/5
कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला. आज मात्र हवामान ढगाळ असले तरी पावसाचा जोर तुलनेत कमी झाला आहे. दुपारनंतर काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असून, वातावरण उष्ण आहे. कोकणात कमाल तापमान 29 अंश तर किमान 24 अंश राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, पावसाची विश्रांती, आज वेगळंच संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल