TRENDING:

T20 World Cup : आफ्रिकेच्या विजयानंतर ग्रुप ए मध्ये ड्रामा, सेमी फायनलच्या रेसमध्ये अजूनही 4 टीम!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 मध्ये दोन विजय मिळवूनही दक्षिण आफ्रिका अजून सेमी फायनलला पोहोचली नाही. या रेसमध्ये अजूनही 4 टीम आहेत.
advertisement
1/6
आफ्रिकेच्या विजयानंतर ग्रुप ए मध्ये ड्रामा, सेमी फायनलच्या रेसमध्ये अजूनही 4 टीम
सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिले टीम इंडियाचा आणि मग वेस्ट इंडिजचा पराभव केला, त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत, तसंच त्यांचा नेट रनरेट हा +2.890 एवढा झाला आहे. दोन मोठे विजय मिळवूनही दक्षिण आफ्रिका अजून सेमी फायनलला पोहोचलेली नाही.
advertisement
2/6
ग्रुप ए मधून अजूनही दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, टीम इंडिया आणि झिम्बाब्वे सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहेत. या चारपैकी 2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
advertisement
3/6
दोन विजय मिळवलेल्या दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलला क्वालिफाय होणं जवळपास निश्चित आहे. आफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे,. या सामन्यात विजय मिळवून आफ्रिका सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. तसंच भारताने त्यांचे उरलेले दोन सामने जिंकले आणि आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाला तरीही दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये जाईल.
advertisement
4/6
दुसरीकडे टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केला आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावला तरी भारतीय टीमचं आव्हान संपुष्टात येईल. भारताने झिम्बाब्वे, वेस्ट इंडिजला हरवलं तर भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलला पोहोचेल.
advertisement
5/6
भारताप्रमाणेच झिम्बाब्वेलाही सेमी फायनलला प्रवेश करण्यासाठी त्यांचे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उरलेले दोन सामने जिंकावे लागणार आहेत, अन्यथा त्यांचंही सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल.
advertisement
6/6
वेस्ट इंडिजला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचा पराभव करणं गरजेचं आहे. 1 मार्चला होणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय झाला आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला पराभूत केलं तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सेमी फायनलला जातील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : आफ्रिकेच्या विजयानंतर ग्रुप ए मध्ये ड्रामा, सेमी फायनलच्या रेसमध्ये अजूनही 4 टीम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल