Rashmika - Vijay Wedding : '...म्हणून रश्मिकाला माझी बायको बनवलं', लग्न लागताच विजयनं कबूल केलं, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vijay Deverakonda post for Rashmika Mandanna : लग्न होताच विजयने रश्मिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने रश्मिकाशी लग्न का केलं हे देखील सांगितलं.
advertisement
1/9

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली होती.
advertisement
2/9
अखेर 26.02.2026 रोजी दोघांनीही लग्न करत त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं. उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न करत अखेर रश्मिका विजयची झाली. लग्न लागताच विजयने रश्मिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
3/9
'...म्हणून रश्मिकाला माझी बायको बनवलं', असं म्हणत विजयने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यात. विजयच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
4/9
रश्मिका आणि विजय यांचं लग्न तेलुगू पद्धतीनं पार पडलं. दोघांनी पारंपरिक पद्धतीचे कपडे परिधान केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
advertisement
5/9
विजयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "एक दिवस मला तिची खूप आठवण आली... अशी आठवण की ती माझ्यासोबत असती तर माझा दिवस अजून सुंदर झाला असता असं वाटलं. ती समोर बसून जेवत असती तर जेवणही अधिक समाधानकारक वाटलं असतं."
advertisement
6/9
"ती सोबत असती तर माझे वर्कआउट्स शिक्षा वाटण्याऐवजी मजेशीर झाले असते. मी कुठेही असलो तरी घरासारखी शांतता आणि आपलेपणाची भावना देण्यासाठी तिचीच गरज होती, असं मनापासून वाटलं. म्हणून मी माझ्या जिवलग मैत्रिणीलाच माझी पत्नी बनवलं. 26.02.2026."
advertisement
7/9
रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. लग्नात दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहेत.
advertisement
8/9
दोघांनी नवरा बायको म्हणून एकत्र पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत 'क्यूटेस्ट कपल', 'मेड फॉर इच अदर' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
9/9
रश्मिका आणि विजय यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आधीपासूनच चर्चेत होती. मात्र आता त्यांनी आयुष्यातही एकत्र येत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika - Vijay Wedding : '...म्हणून रश्मिकाला माझी बायको बनवलं', लग्न लागताच विजयनं कबूल केलं, PHOTO