TRENDING:

Dhule: चढावर घात झाला अन् टँकर आगीचा गोळा बनला, धुळ्यातील भीषण PHOTOS

Last Updated:
धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलपाडा धरणाजवळ केमिकल टँकरला आग लाागली.
advertisement
1/5
Dhule: चढावर घात झाला अन् टँकर आगीचा गोळा बनला, धुळ्यातील भीषण PHOTOS
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलपाडा धरणाजवळ केमिकल टँकरला आग लाागली. आग लागल्यानंतर टँकरचा स्फोट झाल्याचं वृत आहे. या आगीमुळे नागपूर-सुरत मार्गावर  मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 
advertisement
2/5
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नागपूर-सुरत मार्गावर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. अकल्लपाडा धरणाजवळ असलेल्या मार्गावरून जात असताना चढावर अचानक टँकर पलटी झाला. 
advertisement
3/5
टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन होतं, त्यामुळे काही क्षणात टँकरने पेट घेतला.  टँकरला आग लागून परिसरात 30 ते 40 फूट उंच धुराचे लोट उठले होते. बघता बघता टँकर काही क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. 
advertisement
4/5
महामार्गावर टँकरला भीषण आग लागल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी झालं.
advertisement
5/5
४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर  आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, टँकरला आग नेमकी कशामुळे लागली याचं अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Dhule: चढावर घात झाला अन् टँकर आगीचा गोळा बनला, धुळ्यातील भीषण PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल