Friday OTT Releases : या शुक्रवारी थिएटरची मजा घरबसल्या, 'क्रांतिज्योती विद्यालय' OTT वर; ही आहे नवी Warchlist
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Friday OTT Releases : फेब्रुवारीच्या शेवटचा आठवड्यात शुक्रवारी ओटीटी थ्रिलर, क्राइम, इमोशन आणि सामाजिक संदेश देणारे सिनेमा आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत.
advertisement
1/6

फेब्रुवारीचा शेवटचा शुक्रवार आहे. या शुक्रवारी ओटीटीवर सस्पेन्स, क्राइम, मिस्ट्री आणि इमोशनने भरलेलं सिनेमे आणि वेब सीरिज प्रेक्षाकंच्या भेटीला येत आहेत. सायकोलॉजिकल थ्रिलरपासून हृदयाला भिडणाऱ्या स्टोरी तुम्ही पाहू शकता. थिएटरची मज्जा आता घरबसल्या पाहण्यासाठी तयार रहा.
advertisement
2/6
Accused ( Netflix ) - हा सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. एका प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्टच्या आयुष्याभोवती याची कथा फिरते. तिचं परफेक्ट वाटणारं आयुष्य अचानक कोलमडू लागतं जेव्हा तिच्या करिअरवर आणि वैवाहिक आयुष्यावर गंभीर आरोप होतात. नेटफ्लिकवर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. या सिनेमात कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिभा रांता यांसारखे दमदार कलाकार आहेत.
advertisement
3/6
Abar Proloy 2 ( ZEE5 )- ही लोकप्रिय बंगाली क्राइम थ्रिलर सीरिज आहे. त्याचा दुसरा सीझन अधिक अ‍ॅक्शन आणि ड्रामाने भरलेला आहे.
advertisement
4/6
Thadayam ( ZEE5 ) - तामिळनाडूच्या पार्श्वभूमीवर आधारित ही थ्रिलर सीरिज आहे. 1999 मधील खुनांवर आधारित आहे. एसआय अथियामान गावांमध्ये घडणाऱ्या निर्दयी हत्यांचा तपास करतात आणि एक भयानक पॅटर्न उलगडत जातो. मिस्ट्री, इमोशन आणि अ‍ॅक्शनचा प्रभावी संगम ही सीरिज आहे.
advertisement
5/6
क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम ( ZEE5 ) - बंद होणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळांवर आधारित हा सिनेमा आहे. शिक्षण, संस्कृती आणि एकतेचा संदेश देणारी ही भावनिक कथा प्रेक्षकांना नक्कीच स्पर्शून जाईल.
advertisement
6/6
Secret Stories: Roslin ( JioHotstar ) - ही मल्याळम सायकोलॉजिकल मिस्ट्री सीरिज आहे. एका 17 वर्षांच्या रोजलिनची ही कथा आहे. जिला हिरव्या डोळ्यांच्या एका गूढ व्यक्तीचे भयानक स्वप्न पडतात. जेव्हा वास्तव आयुष्यातही तशाच घटना घडू लागतात. सस्पेन्स, भीती आणि ट्विस्टने भरलेली ही सिरीज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday OTT Releases : या शुक्रवारी थिएटरची मजा घरबसल्या, 'क्रांतिज्योती विद्यालय' OTT वर; ही आहे नवी Warchlist