Pune Food : पिझ्झा थालीपीठचा अनोखा फ्युजन, फक्त 40 रुपयांत, पुण्यात इथं चाखा चवं
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पिझ्झा थालीपीठ आणि चीज थालीपीठ या अनोख्या फ्युजन पदार्थांनी सध्या तरुणाईची मनं जिंकली आहेत. हेल्दी आणि रुचकर चव यांचा संगम असलेला हा पदार्थ कमी किमतीत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होत आहे.
advertisement
1/7

पारंपरिक थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल, तर आता त्याला पिझ्झाचा ट्विस्ट देणारा भन्नाट पर्याय कर्वेनगरमध्ये उपलब्ध झाला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे पिझ्झा थालीपीठ आणि चीज थालीपीठ या अनोख्या फ्युजन पदार्थांनी सध्या तरुणाईची मनं जिंकली आहेत. हेल्दी आणि रुचकर चव यांचा संगम असलेला हा पदार्थ कमी किमतीत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होत आहे.
advertisement
2/7
कैलास काळे आणि प्रांजल काळे या दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी केवळ 50 हजार रुपयांचे कर्ज घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्याशा फूड कार्टपासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन दुकानांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
3/7
कर्वेनगर परिसरात अनेक महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. तरुणांना चविष्ट पण आरोग्यदायी पर्याय द्यावा या उद्देशाने त्यांनी पारंपरिक थालीपीठाला आधुनिक रूप देण्याचा प्रयोग केला.
advertisement
4/7
प्रांजल काळे सांगतात, माझे पती पुण्यात नोकरी करत होते. नोकरीसोबत एखादा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मनात होती. विद्यार्थ्यांना हेल्दी पदार्थ हवेत, हे लक्षात घेऊन आम्ही प्रथम चीज थालीपीठ सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पिझ्झा थालीपीठ ही संकल्पना राबवली.
advertisement
5/7
या थालीपीठामध्ये पारंपरिक भाजणी, ताज्या भाज्या आणि वरून चीज तसेच पिझ्झा टॉपिंगचा वापर केला जातो. त्यामुळे चवीसोबत पौष्टिकताही जपली जाते. विशेष म्हणजे या पदार्थाची किंमत अवघ्या 40 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तो परवडणारा पर्याय ठरतो.
advertisement
6/7
गावाकडे केक व्यवसायाचा अनुभव असलेल्या काळे दाम्पत्याने पुण्यात नवीन काहीतरी करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला टेबल लावून सुरू केलेला हा व्यवसाय आज स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
advertisement
7/7
ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हीच त्यांच्या यशाची खरी पावती असल्याचे ते सांगतात. पारंपरिक आणि आधुनिक चवींचा संगम घडवणारे हे पिझ्झा थालीपीठ सध्या कर्वेनगरमधील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हेल्दी फास्टफूडचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास बनले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Pune Food : पिझ्झा थालीपीठचा अनोखा फ्युजन, फक्त 40 रुपयांत, पुण्यात इथं चाखा चवं