TRENDING:

IND vs ZIM :सेमी फायनलआधी टीम इंडियाला मिळाल्या तीन गुडन्यूज, कॅप्टन सूर्याच सर्वात मोठं टेन्शन मिटलं

Last Updated:
दरम्यान टीम इंडिया या विजयानंतर सेमी फायनलपासून एक पाऊल दूर आहे.त्यामुळे सेमी फायनल पोहोचण्याआधीच टीम इंडियाला तीन गूडन्यूज मिळाल्या आहे. या गुडन्यूजमुळे सूर्याचं मोठं टेन्शन मिटलं आहे.
advertisement
1/9
सेमी फायनलआधी टीम इंडियाला मिळाल्या तीन गुडन्यूज, कॅप्टन सूर्याच सर्वात मोठं टेन
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने झिम्बाबेचा 72 धावांनी पराभव केला आहे.या विजयासह टीम इंडियापासून सेमी फायनलपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
advertisement
2/9
भारताने दिलेल्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबे फक्त 184 धावा करू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/9
दरम्यान टीम इंडिया या विजयानंतर सेमी फायनलपासून एक पाऊल दूर आहे.त्यामुळे सेमी फायनल पोहोचण्याआधीच टीम इंडियाला तीन गूडन्यूज मिळाल्या आहे. या गुडन्यूजमुळे सूर्याचं मोठं टेन्शन मिटलं आहे.
advertisement
4/9
टीम इंडियाची आज पहिल्यांदाच चांगली ओपनिंग झाली. याआधी अभिषक शर्मा तीनदा डकवर आऊट झाला होता,त्याच्यानंतर ईशान एकदा डकवर आऊट झाला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती. पण आज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने 48 धावांची चांगली सूरूवात करून दिली होती.
advertisement
5/9
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला आहे असे म्हणता येईल कारण आजच्या सामन्यात त्याने 30 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली होती. याआधी तो तीनदा डकवर आऊट झाला होता. पण आज त्याच्या या खेळीने त्याला सूर गवसला आहे.
advertisement
6/9
टीम इंडियाचा तिलक वर्मा मागच्या अनेक सामन्यापासून धावा करण्यात अपयशी ठरत होता किंवा खूपच हळू खेळत होता.त्यात लेफ्टी बॅटर कॉम्बिनेशनमुळे त्याला बाहेर करण्याची भीती होती.पण त्याला आज कशी बशी संधी मिळाली. विशेष म्हणजे तो सहाव्या स्थानी उतरला आणि त्याने 16 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली होती.
advertisement
7/9
टीम इंडियाचा हार्दिक पांड्याने देखील आज चांगली फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने आज 23 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली होती. हार्दिक आणि तिलक वर्माच्या या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने 256 धावा ठोकल्या होत्या.
advertisement
8/9
गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर थोडी निराशा झाली. पण सर्वच गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली असे नाही आहे. अर्शदिपने 4 ओव्हरमध्ये 24 धावा करून 3 विकेट पटकावल्या होत्या. हार्दिक पांडयाने 3 ओव्हरमध्ये 21 आणि बुमराहने देखील तितक्याच ओव्हरमध्ये तितक्याच धावा दिल्या होत्या.
advertisement
9/9
तसेच स्पिनर्समध्ये वरून चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने 4 ओव्हर टाकून प्रत्येकी 35 धावा दिल्या आणि एक-एक विकेट काढली. फक्त शिवम दुबेने 46 धावा देऊन घाणेरडी गोलंदाजी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ZIM :सेमी फायनलआधी टीम इंडियाला मिळाल्या तीन गुडन्यूज, कॅप्टन सूर्याच सर्वात मोठं टेन्शन मिटलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल