T20 World Cup : झिम्बाब्वेसमोर वाचलात, डेंजर वेस्ट इंडिजसमोर कसे टिकणार? 5 गोष्टींनी वाढली टीम इंडियाची धाकधूक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाचा 72 रननी विजय झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं आव्हान कायम आहे.
advertisement
1/8

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारतीय टीमने 20 ओव्हरमध्ये 256/4 पर्यंत मजल मारली. भारताचा टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला हा सर्वोत्तम स्कोअर आहे. यानंतर भारताने झिम्बाब्वेला 20 ओव्हरमध्ये 184 रनवर रोखलं.
advertisement
2/8
अभिषेक शर्माने 30 बॉलमध्ये 55 आणि तिलक वर्माने 16 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी केली. अभिषेक आणि तिलक या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये संघर्ष करत होते, त्यामुळे या दोघांना गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी दिलासादायक आहे.
advertisement
3/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्चला कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये होणार आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे, अन्यथा टीम इंडियाचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल.
advertisement
4/8
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही गोष्टींनी कॅप्टन सूर्याची धाकधूक वाढवली आहे. भारताच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेनेही 20 ओव्हरमध्ये 184 रनपर्यंत मजल मारली. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची बॉलिंग अपयशी ठरली.
advertisement
5/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबने 2 ओव्हरमध्ये 32 रन दिले होते, तर झिम्बाब्वेविरुद्ध दुबेने 2 ओव्हरमध्ये तब्बल 46 रन लुटले. याशिवाय वरुण चक्रवर्तीही मागच्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. आफ्रिकेविरुद्ध वरुणने 4 ओव्हर 47 आणि झिम्बाब्वेविरुद्ध 4 ओव्हर 35 रन दिले.
advertisement
6/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजने 83 रनवर 7 विकेट गमावल्या होत्या, पण तरीही त्यांनी 176 रनपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य बॉलिंगवरही वेस्ट इंडिजने आक्रमण केलं, त्यामुळे टीम इंडियाला त्यांच्या बॉलिंगमध्ये सुधार करावा लागणार आहे.
advertisement
7/8
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाच्या फिल्डिंगमध्येही चुका झाल्या. वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर रिंकू सिंगने एक कॅच सोडला, तर शिवम दुबेने बाऊंड्री लाईनवर संथपणा दाखवला त्यामुळे झिम्बाब्वेला एक फोर मिळाली.
advertisement
8/8
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विरोधी टीमच्या कॅप्टननी पहिल्याच ओव्हरला ऑफ स्पिनरला बॉलिंग देऊन अभिषेक शर्मा आणि इशान किशनला सापळ्यात अडकवलं. झिम्बाब्वेने मात्र ही रणनीती वापरली नाही. वेस्ट इंडिज मात्र ऑफ स्पिनर असलेल्या रॉस्टन चेसला पहिली ओव्हर देऊन टीम इंडियाला पुन्हा अडचणीत आणू शकते, त्यामुळे या सापळ्यापासून भारतीय खेळाडूंना सावध राहावं लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : झिम्बाब्वेसमोर वाचलात, डेंजर वेस्ट इंडिजसमोर कसे टिकणार? 5 गोष्टींनी वाढली टीम इंडियाची धाकधूक!