T20 World Cup : सगळे चांगले खेळले, तरी सूर्या खूश नाही, वेस्ट इंडिजविरुद्ध एकाला बाहेर काढणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 72 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं आव्हानही अजून कायम आहे.
advertisement
1/10

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर आता टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला तर मात्र टीम इंडियाचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल.
advertisement
2/10
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाच्या बॅटिंगने धमाका केला. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकं केली तर इतर बॅटरनीही त्यांना चांगली साथ देऊन स्कोअर 256 पर्यंत नेला. हार्दिकने 23 बॉलमध्ये नाबाद 50 आणि अभिषेकने 30 बॉलमध्ये 55 रन केले.
advertisement
3/10
तिलक वर्माने 16 बॉलमध्ये नाबाद 44, सूर्यकुमार यादवने 13 बॉल 33, इशान किशनने 24 बॉलमध्ये 38 आणि संजू सॅमसनने 15 बॉल 24 रन केले. टीम इंडियाच्या प्रत्येक बॅटरने या सामन्यात 20 पेक्षा जास्त रन केल्या आहेत.
advertisement
4/10
बॅटिंगमध्ये टीम इंडियाने धमाका केला असला तरी बॉलिंगमध्ये मात्र टीम इंडियाला संघर्ष करावा लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही मॅचनंतर टीम इंडियाच्या बॉलिंगबद्दल नाराजी व्यक्त केली. बॉलिंगमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
5/10
शिवम दुबेच्या दोन ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने 46 रन काढल्या. अक्षर पटेलने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 35 रन दिले, तर वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 35 रन दिल्या.
advertisement
6/10
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी बॉलिंगमध्ये जास्त रन दिल्या होत्या, त्यामुळे भारतीय बॉलर्सनी कर्णधार सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवलं आहे.
advertisement
7/10
सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे, त्यामुळे या सामन्यात कॅप्टन सूर्या त्याचं प्रमुख अस्त्र बाहेर काढू शकतो. कुलदीप यादवला वेस्ट इंडिजविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
advertisement
8/10
कुलदीप यादवचं वेस्ट इंडिजविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. कुलदीप यादव हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर आहे. कुलदीपने वेस्ट इंडिजविरुद्ध 6 सामन्यांमध्ये 13 ची सरासरी आणि 6.50 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
9/10
वेस्ट इंडिजचे खेळाडू आक्रमक असले तरी त्यांना कुलदीपच्या स्पिनसमोर बॅटिंग करताना संघर्ष करावा लागतो. कुलदीप यादवचा गुगली समजण्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अडचणीत येतात, त्यामुळे कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
10/10
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रविवार 1 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात होणार आहे. इडन गार्डनची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे, त्यामुळे कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सगळे चांगले खेळले, तरी सूर्या खूश नाही, वेस्ट इंडिजविरुद्ध एकाला बाहेर काढणार!