TRENDING:

Railway : ट्रेनच्या सीटवर ही पॉकेटसारखी जागा का असते? रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या फायद्याचं, अनेकांना माहितीच नाही याचा वापर

Last Updated:
AC Train Seat : एसी ट्रेनने प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की सीटवर एक असं अर्धवट लेदर असतं, ते असंच नसतं. त्याचा मोठा वापर आहे.
advertisement
1/7
ट्रेन सीटवर पॉकेटसारखी जागा का असते? मोठ्या फायद्याचं,अनेकांना माहिती नाही वापर
तुम्ही एसी ट्रेनमधून प्रवास केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल सीटवर लेदरचा एक एक्स्ट्रा किंवा वेगळा थर असतो. म्हणजे पूर्ण सीट लेदरची असते, तरी त्यावर आणखी एक लेदरची पट्टी असते, जे सीटवर पॉकेटसारखं असतं. पण हे का असतं तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/7
तुम्हाला हा फॉल्ट किंवा डिझाइन वाटेल. पण सीटवरील हे एक्स्ट्रा कव्हर असंच दिलेलं नाही तर त्यामागे एक खास कारण आहे. हे एक्स्ट्रा कव्हर प्रवाशांसाठीच आहे, ज्याचा प्रवाशांना मोठा फायदा आहे. आता तो काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते जाणून घेण्याची उत्सुकताही असेल.
advertisement
3/7
सीटवर रेक्सिनचा एक वेगळा थर असतो. हा थर मुख्य रेक्सिनला म्हणजेच सीटच्या फॅब्रिकला जोडलेला असतो. अलीकडेच एका युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा फोटो पोस्ट केला आणि लोकांना त्याबद्दल विचारलं.
advertisement
4/7
रेडिट फोरम r/indianrailways वर एसी कोच सीटचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सीट दाखवत त्याने ही वेगळी स्लीव्ह का आहे, असं वितारलं.  फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की युझरने ती स्लीव्ह वर उचलली आहे जेणेकरून ती दाखवता येईल. ही स्लीव्ह सीट संपूर्ण सीटवर शिवलेली नाही, तर अर्ध्या भागात शिवलेली आहे.
advertisement
5/7
त्या माणसाने त्याच्या पोस्टसोबत लिहिलं, "मी खूप दिवस ट्रेनने प्रवास करत आहे. मला आश्चर्य वाटतं की सीटवर हा वेगळा थर का दिला जातो. सहसा अशा गोष्टींचा काही उद्देश असतो, पण बऱ्याचदा सामान्य लोकांना त्याबद्दल माहिती नसते. जर तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल, तर तुम्ही सीटवर हा फ्लॅप पाहिला असेल. जर तुम्हाला माहित नसेल, तर मला समजावून सांगा"
advertisement
6/7
खरं तर हा लेयर चादरी आत घालण्यासाठी आहे. रेल्वेने ट्रेनमध्ये दिलेल्या बेडिंगमध्ये दोन चादरी आणि एक ब्लँकेट असतं. चादरी सीटवर पसरवल्यानंतर तुम्ही चादरींचे कोपरे या थरांमध्ये टाकू शकता जेणेकरून तुम्ही वळताना चादरी जागेवरून घसरणार नाही.
advertisement
7/7
ही माहिती मिळाल्यावर बहुतेक लोकांनी याबाबत आपल्याला माहितीच नसल्याचं सांगितलं. तुम्हाला याबाबत माहिती होती का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Railway : ट्रेनच्या सीटवर ही पॉकेटसारखी जागा का असते? रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या फायद्याचं, अनेकांना माहितीच नाही याचा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल