Tips And Tricks : कपड्यांवर पडलेले पेन्टचे, फेव्हिक्विकचे डागही सहज निघतील! 'हे' घरगुती उपाय एकदा करून पाहा
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Tips To Remove Stubborn Stain : कपड्यांवर पडलेले काही डाग आपल्यासाठी अवघड काम बनून बसतात. काही केल्या ते डाग निघताच नाहीत आणि दिवसागणिक ते आणखी घट्ट होत जातात. सर्वात जास्त हट्टी डाग असतात ते म्हणजे, पेन्टचे, फेव्हिक्विकचे किंवा शर्टची पिवळी झालेली कॉलर.. पण घाबरण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्या हे डाग अगदी सहज काढतील.
advertisement
1/7

कितीही हट्टी डाग असो, योग्य पद्धत वापरलायस ते नक्कीच कमी होऊ शकतात. काही सोप्या आणि स्वस्त घरगुती वस्तूंच्या मदतीने तुम्ही कापडाचे कोणतेही नुकसान न करता हे हट्टी डाग सहजपणे काढू शकता. याने कपड्यांचा रंग आणि चमक दोन्ही टिकून राहते.
advertisement
2/7
फेविक्विक हा असं ग्लु आहे, जो काही केल्या कपड्यनवरून आणि आपल्या हाताला चिकटल्यास त्यावरून निघत नाही. फेविक्विक ओले असताना त्याला स्पर्श करणे टाळा आणि ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यावर त्यावर तयार झालेला कडक थर हळूवारपणे काढून टाका. नंतर कापसाच्या बोळ्यावर थोडेसे नेलपॉलिश रिमूव्हर लावा आणि डागावर हळूवारपणे लावा. याने ते पूर्ण पाने निघून जाईल आणि कपडे स्वच्छ होतील.
advertisement
3/7
कपड्यांवरील रंगाचे डागही खूप जिद्दी असतात. कारण रंगाचा थर फॅब्रिकमध्ये बसतो आणि पाण्याने सहज धुतला जात नाही. म्हणून हे डाग काढण्यासाठी तो डाग पूर्णपणे सुकू द्या. नंतर त्या भागावर थोडे अल्कोहोल लावा. जर अल्कोहोल उपलब्ध नसेल तर घट्ट साबणाचे द्रावण तयार करा आणि ते डागावर लावा. यानंतर हातांनी हळूवारपणे घासून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. हा सोपा उपाय जुने आणि हट्टी रंगाचे डागदेखील हलके करू शकतो.
advertisement
4/7
बऱ्याचदा घाम आणि धुळीमुळे आपल्या शर्टाचे कॉलर पिवळे होते. त्यावर पिवळे डाग दिसू लागतात. हे डाग सहज निघत नाही. हे डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट कॉलरला नीट लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने किंवा बोटांनी हळूवारपणे घासून घ्या. नंतर कपडे धुवा. कॉलर पूर्णपणे स्वच्छ होईल.
advertisement
5/7
चहा आणि कॉफीचे डाग कपड्यांमध्ये खूप खोलवर लागतात. ते लवकर साफ केले नाही तर ते काढणे अगदी अशक्य होवू शकते.
advertisement
6/7
चहा आणि कॉफीचे डाग काढण्यासाठी, डाग असलेल्या ठिकाणी थोडे टूथपेस्ट लावा आणि सुमारे 5 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते हळूवारपणे घासून स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही एक चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळून डागावर लावू शकता. यानेही काही मिनिटांनी डाग कमी होऊ लागतील.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : कपड्यांवर पडलेले पेन्टचे, फेव्हिक्विकचे डागही सहज निघतील! 'हे' घरगुती उपाय एकदा करून पाहा