TRENDING:

अख्खं विमान खाक, कपलचा मृत्यू; पण प्लेन क्रॅशमध्ये श्वान मात्र बचावला; कसा झाला चमत्कार?

Last Updated:
विमान अपघाताच्या कितीतरी बातम्या तुम्हाला माहिती असतील. ज्यात क्वचितच लोक वाचल्याची माहिती आहे. पण एक असा विमान अपघात ज्यात एका कपलचा मृत्यू झाला, विमान खाक झालं पण त्यांच्यासोबत प्रवास करणारा कुत्रा मात्र बचावला.
advertisement
1/5
अख्खं विमान खाक, कपलचा मृत्यू; पण प्लेन क्रॅशमध्ये श्वान मात्र बचावला; कसा काय?
टेक्सासमधील ही घटना. फ्लाइट इन्स्ट्रक्टर रॉन जे. टिमरमन आणि त्यांची पत्नी बारबरा टिमरमन खासगी विमानाने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला पण त्यांचा कुत्रा बचावला.
advertisement
2/5
रॉन जे. टिमरमन 1998 पासून फ्लाइट इन्स्ट्रक्टर होता होता. तो फ्लोरिडातील ऑर्लॅंडो येथे स्वतःची एव्हिएशन कंपनी आयलरॉन टी एलएलसी चालवत होता. त्याला 2021 मध्ये एफएएने नॅशनल सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टर ऑफ द इयर म्हणून गौरवलं होतं.
advertisement
3/5
11 फेब्रुवारी 2026 रोजी तो त्याची पत्नी बारबरा टिमरमन आणि पाळीव श्वानासोबत खासगी प्लेनने प्रवास करत होता. बीचक्राफ्ट A36 विमान. संध्याकाळी 5.13 वाजता मर्चिसन जवळील ब्राउन्सबोरो इथं अपघात झाला.
advertisement
4/5
एफएएच्या प्राथमिक तपासानुसार इंजिनमध्ये समस्या आणि विंडशील्डवर तेल असल्याने स्पष्ट दिसत नव्हतं. ब्राउन्सबोरोमध्ये त्यांनी एमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण विमान एका वीज तारेवर आदळलं, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळलं आणि आग लागली.
advertisement
5/5
विमान आगीत जळून खाक झालं. कपलचा घटनास्थळीच मृत्यू झाला, पण त्यांचा कुत्रा वाचला. तिथल्याच एका राहणाऱ्याने कुत्र्याला आपल्याकडे घेतलं. या कपलच्या निधनानंतर त्यांची मुलगी जी पशुवैद्य आहे आणि नात त्याची काळजी घेत आहेत. कुत्र्याचं वाचणं हा चमत्कार मानला गेला. आग आणि आघात असूनही त्याला काहीच झालं नाही. तो जखमी न होता बाहेर आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अख्खं विमान खाक, कपलचा मृत्यू; पण प्लेन क्रॅशमध्ये श्वान मात्र बचावला; कसा झाला चमत्कार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल