मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येते नवी Maruti Brezz! असणार लग्जरी फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Brezza चा अपडेटेड व्हर्जन नवीन डिझाइन, मोठे टचस्क्रिन आणि प्रीमियम फीचर्ससह येण्याच्या तयारीत आहे. यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, हेड-अप डिस्प्ले आणि सनरुफ मिळू शकते.
advertisement
1/7

मारुती सुझुकी भारतीय बाजारामध्ये ब्रेझाच्या अपडेटेड व्हर्जनला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सध्या दुसऱ्या जनरेशनची ही एसयूव्ही 2022 मध्ये लॉन्च झाली होती. आता यामध्ये काही मोठे बदल होण्याची आशा आहे.
advertisement
2/7
या सर्व बदलांमुळे ग्राहकांमध्ये कारची लोकप्रियता वाढण्याची अपेक्षा आहे. हे बदल पहिले पाहिलेल्या गेलेल्या टेस्ट गाड्यांच्या फोटोमध्येही दिसले आहेत. चला पाहूया या कारमध्ये तुम्हाला कोणकोणते फीचर्स पाहायला मिळू शकतात.
advertisement
3/7
डिझाइन अपग्रेड्स : ब्रेझ्झाने तिचे मूळ डिझाइन कायम ठेवले आहे, परंतु तिच्या पुढील आणि मागील बाजूस बदल होण्याची शक्यता आहे. यात नवीन बंपर, अधिक आकर्षक ग्रिल आणि मागील बाजूस काही बदल असतील, जरी यावेळी त्यात आकर्षक कनेक्टेड टेल लॅम्प नसतील.
advertisement
4/7
मोठी टचस्क्रीन : इंटीरियर लेआउटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र काही लहान-मोठ्या सुधारणा पाहयाला मिळाल्या आहेत. जसं की, नवं सेंटर कंसोल आणि नवी सेटिंग. काही फोटोंवरुन संकेत मिळाला आहे की, यामध्ये इंफोटेनमेंटसाठी एक मोठी टचस्क्रिन असेल. जी वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोने लेस असेल. इतर सुविधामध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी, एम्बिएंट लाइट्स आणि सिंगल-पॅनल सनरुफचा समावेश असू शकतो.
advertisement
5/7
व्हेंटिलेटेड सीट्स : फीचर अपग्रेड म्हणून, एसयूव्हीमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आराम मिळेल. हे फीचर महिंद्रा XUV3XO, ह्युंदाई व्हेन्यू आणि इतर मॉडेल्ससह बहुतेक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
6/7
पॉवरट्रेनमध्ये होणार बदल : इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 1.5 -लिटर पेट्रोल इंजिन आपल्या 5-स्पीड मॅन्यु्ल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्यायांसह येईल. मात्र सध्याच्या टेस्टिंग दरम्यान कळलंय की, यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनही जोडलं जाऊ शकतं. फ्रॉन्क्सकडून 1.0-लिटर टर्बो इंजिन उधार घेतल्याची चर्चा आहे, जरी याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
advertisement
7/7
अंडरबॉडी सीएनजी टँक : सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे व्हिक्टोरिया-प्रेरित अंडरबॉडी टँक. टाकी ट्रंकपासून अंडरबॉडीमध्ये हलवल्याने एसयूव्हीला चांगली ट्रंक स्पेस मिळेल, अगदी सीएनजी प्रकारातही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येते नवी Maruti Brezz! असणार लग्जरी फीचर्स