TRENDING:

Numerology: बहुप्रतिक्षित गुडन्यूज येणार! मूलांक 1, 2, 3, 4 असणाऱ्यांसाठी मार्च महिना कसा असेल? कष्टाचे फळ

Last Updated:

March Month Numerology: अंकशास्त्रानुसार 2026 चा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असेल, त्याचं हे सविस्तर भाकीत ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी केले आहे. तुमची जन्मतारीख ज्या मूलांकात येते, त्यानुसार तुमचं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मूलांक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक)
News18
News18
advertisement

हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आणि स्वतःला ओळखण्याचा असेल. तुमच्या स्वभावात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी दिसेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे ओढले जातील. तुमचे निर्णय घेण्याची ताकद वाढेल आणि आत्मविश्वासही दणकट होईल. ऑफिसमध्ये बॉस आणि मोठ्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील, जुने वाद मिटून जातील. पण एक लक्षात ठेवा, तुमचे शत्रू या काळात थोडे जास्त डोकं वर काढू शकतात, त्यामुळे डोकं शांत ठेवा. महिन्याच्या मध्यात कामाचा लोड वाढेल, तिथे तुम्हाला शिस्त पाळावी लागेल. जर तुमची पगारवाढ किंवा प्रमोशन रखडलं असेल, तर त्याबद्दल बोलायला ही एकदम सही वेळ आहे.

advertisement

मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

मार्च महिना तुमच्यासाठी स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा काळ असेल. तुम्ही तुमच्या वाईट सवयी आणि नकारात्मक विचार बदलण्याचा प्रयत्न कराल. अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढल्यामुळे मनाला थोडी शांतता मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सुरुवातीला काही जबाबदाऱ्या तुमच्याकडून कमी केल्या जाऊ शकतात, पण तुमच्या कष्टाने तुम्ही त्या पुन्हा मिळवाल. खर्चावर थोडा लगाम ठेवा. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. स्वतःला वेळ देण्यासाठी तुम्हाला थोडं एकटं राहायला आवडेल, जे तुमच्या प्रगतीसाठी चांगलंच आहे.

advertisement

मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक

मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)

हा महिना लोकांशी ओळखी वाढवण्याचा आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा असेल. सामाजिक कार्यक्रमात तुमचा वावर वाढेल, तिथे तुम्हाला तुमच्यासारख्याच विचारांचे लोक भेटतील ज्यांचा भविष्यात फायदा होईल. तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल आता जास्त गंभीर व्हाल. फालतू खर्च टाळल्यामुळे पैशांची अडचण भासणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा पगारवाढीबद्दल वरिष्ठांशी बोलायला हा महिना चांगला आहे. ऑफिसमध्ये एखादा सहकारी स्वार्थाशिवाय तुम्हाला मदत करेल. फक्त फालतू चर्चेत पडू नका, नाहीतर ऑफिसमध्ये विनाकारण शत्रू वाढतील.

advertisement

धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; मार्चमध्ये कोणाला सूर गवसणार?

मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानलं गड्या! दूध शिल्लक राहिलं, पांडुरंगनं डोकं लावलं, आता 25 लाखांचा टर्नओव्हर
सर्व पहा

शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत मार्च महिन्यात तुमची प्रगती एकदम भारी होईल. तुमच्या हुशारीचं कौतुक होऊन तुम्हाला एखादं बक्षीस मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पोरांसाठी पहिला, दुसरा आणि चौथा आठवडा खूपच यश घेऊन येईल, फक्त मन लावून अभ्यास करा. आरोग्याच्या बाबतीत हा महिना चढ-उतारांचा असेल. फिट राहण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवाल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात थोडी धावपळ आणि संघर्ष करावा लागू शकतो, पण बाकी दिवस मजेत जातील.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: बहुप्रतिक्षित गुडन्यूज येणार! मूलांक 1, 2, 3, 4 असणाऱ्यांसाठी मार्च महिना कसा असेल? कष्टाचे फळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल