TRENDING:

T20 World Cup : 'बाबा तुमच्या टीममध्ये...', पाकिस्तान क्रिकेटचा फॅमिली ड्रामा, जावई-सासऱ्याच्या संघर्षात लेक घायाळ!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीची कामगिरी निराशाजनक झाली. भारताविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी आफ्रिदीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीची कामगिरी निराशाजनक झाली. भारताविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी आफ्रिदीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि शाहिन आफ्रिदीचा सासरा शाहिद आफ्रिदीने शाहिनवर जोरदार टीका केली होती. शाहिन आफ्रिदीला टीममधून डच्चू देण्यात यावा, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला होता, त्यानंतर नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानने शाहिन आफ्रिदीला टीमबाहेर ठेवलं.
'बाबा तुमच्या टीममध्ये...', पाकिस्तान क्रिकेटचा फॅमिली ड्रामा, जावई-सासऱ्याच्या संघर्षात लेक घायाळ!
'बाबा तुमच्या टीममध्ये...', पाकिस्तान क्रिकेटचा फॅमिली ड्रामा, जावई-सासऱ्याच्या संघर्षात लेक घायाळ!
advertisement

एका मॅचला डच्चू देण्यात आल्यानंतर शाहिन आफ्रिदीला इंग्लंडविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आणि त्याने धमाकेदार पुनरागमन केलं. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 4 विकेट घेतल्या. शाहिनच्या या कामगिरीनंतर आफ्रिदीने आणखी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला आफ्रिदी?

'मला त्याला रागवायचं होतं. पुढच्या मॅचमध्येही तुम्ही मला विचारलंत तर तेव्हाही मी शाहिन बाहेर ठेवेन, टीममध्ये जागा देणार नाही. त्याला असाच राग येऊ दे. काही लोकांच्या अहंकाराला मारावं लागतं, त्यांना राग येऊ द्यावा लागतो. शाहिनचं मन कसं आहे, ते मला चांगलंच माहिती आहे, मी माझ्या मुलीलाही याबद्दल सांगितलं', असं शाहिद आफ्रिदी एका टीव्ही शोमध्ये म्हणाला आहे.

advertisement

शाहीन आफ्रिदीचे लग्न शाहीद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी झाले आहे. शाहीदने त्याला वगळल्याच्या वक्तव्यानंतर, त्याची मुलगी अंशा त्याच्यावर रागावली. शाहीद आफ्रिदीने स्वतः हे सांगितले. यानंतर, शाहीद आफ्रिदीने त्याच्या मुलीला पुढील सामन्यात त्याची (शाहीन आफ्रिदीची) कामगिरी पाहण्यास सांगितले. शाहीद आफ्रिदी पुढे म्हणाला, 'तुम्हाला काही लोकांच्या मनाशी खेळावे लागेल, म्हणून मी खेळलो'

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब दराची लाली वाढली, आल्यामध्येही सुधारणा, द्राक्षाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

शाहीन आफ्रिदीच्या इंग्लंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतरही, पाकिस्तानला 2 विकेटने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचं या टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'बाबा तुमच्या टीममध्ये...', पाकिस्तान क्रिकेटचा फॅमिली ड्रामा, जावई-सासऱ्याच्या संघर्षात लेक घायाळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल