APMC Market : डाळिंब दराची लाली वाढली, आल्यामध्येही सुधारणा, द्राक्षाला काय मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची दररोज आवक होत असते. यामध्ये प्रत्येक पिकांच्या भावामध्ये चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतो.
सांगली: राज्यातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची दररोज आवक होत असते. यामध्ये प्रत्येक पिकांच्या भावामध्ये चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतो. गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात.
आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1395 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 603 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4500 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 87 क्विंटल आल्यास 2750 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1135 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1107 क्विंटल द्राक्षास 120 ते 400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 224 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंब दराची लाली वाढली
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1202 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 821 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल डाळिंबास 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 9:30 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : डाळिंब दराची लाली वाढली, आल्यामध्येही सुधारणा, द्राक्षाला काय मिळाला भाव?







