Washing Machine : जड ब्लँकेट आणि गोधड्या घरी धुताना 'या' चुका टाळा; मशीन खराब होईल आणि ब्लँकेटही! जाणून घ्या योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कपड्यांचा आकार आणि वजन इतकं असतं की ते वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे की बाहेरून 'ड्राय क्लीन' करून आणायचे, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. जर तुम्हीही घरच्या मशीनमध्ये ब्लँकेट धुण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
वेळेनुसार या ब्लँकेट्सवर घाम, धूळ आणि शरीरातील नैसर्गिक तेलाचे थर साचतात. यामुळे केवळ दुर्गंधीच येत नाही, तर त्वचेचे आजार होण्याचाही धोका असतो. पण, या कपड्यांचा आकार आणि वजन इतकं असतं की ते वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे की बाहेरून 'ड्राय क्लीन' करून आणायचे, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. जर तुम्हीही घरच्या मशीनमध्ये ब्लँकेट धुण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
सर्वात आधी 'केअर लेबल' तपासाकोणतेही महागडे ब्लँकेट धुण्यापूर्वी त्यावर असलेल्या केअर लेबल (Care Label) कडे लक्ष द्या. त्यावर ते मशीनमध्ये धुता येईल का, पाण्याचे तापमान किती असावे आणि ते वाळवायचे कसे, याची स्पष्ट माहिती असते. जर त्यावर 'Only Dry Clean' असे लिहिले असेल, तर चुकूनही घरी प्रयोग करू नका. विशेषतः लोकर, रेशीम किंवा इलेक्ट्रिक ब्लँकेट्स घरच्या मशीनमध्ये धुणं महागात पडू शकतं.
advertisement
तुमच्या मशीनची क्षमता किती आहे?तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये ब्लँकेट टाकण्यापूर्वी मशीनचा ड्रम किती वजनाचा भार पेलू शकतो, हे तपासा. साधारणपणे 7 ते 9 किलो वजनाचे ब्लँकेट मोठ्या 'फ्रंट-लोडिंग' मशीनमध्ये धुतले जाऊ शकतात. ब्लँकेट मशीनमध्ये टाकल्यानंतर ते ड्रममध्ये सहज फिरले पाहिजे. जर तुम्ही ब्लँकेट कोंबून भरले, तर मशीनच्या मोटरवर ताण येईल आणि तुमचे ब्लँकेटही नीट स्वच्छ होणार नाही.
advertisement
पाण्याचे तापमान आणि डिटर्जंटची निवडजड ब्लँकेट्स धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा किंवा लेबलवर सांगितल्याप्रमाणे कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाण्यामुळे ब्लँकेट आकसण्याची किंवा त्याचा कापड खराब होण्याची शक्यता असते.ब्लँकेट धुताना तीव्र रसायने असलेले डिटर्जंट वापरू नका. हलके (Mild) डिटर्जंट वापरा. तसेच, 'फॅब्रिक सॉफ्टनर'चा वापर टाळणेच चांगले, कारण ते कालांतराने ब्लँकेटच्या तंतूंना (Fibers) नुकसान पोहोचवतात.
advertisement
वॉशिंग सायकल आणि स्पिन सेटिंगब्लँकेट किंवा गोधडी धुताना नेहमी 'Gentle' किंवा 'Wool' सेटिंग निवडा. यामुळे कापडाचे नुकसान होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'स्पिन' सायकल! जड ब्लँकेट पाणी जास्त शोषतात, त्यामुळे ते खूप जड होतात. जर तुम्ही मशीन खूप वेगाने फिरवली, तर मशीनचा बॅलन्स बिघडू शकतो. म्हणूनच स्लो किंवा मिडीयम स्पिन सेटिंगचा वापर करा.
advertisement
वाळवण्याची योग्य पद्धत (Drying)ब्लँकेट धुल्यानंतर ते नीट वाळवणे हे सर्वात मोठे आव्हान असते.जर लेबलवर परवानगी असेल तरच 'टंबल ड्राय' करा, तेही कमी तापमानावर.सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे हवेवर वाळवणे. ब्लँकेट कडक उन्हात वाळवू नका. सावलीत किंवा जिथे हवा खेळती असेल अशा ठिकाणी ब्लँकेट पसरवून वाळवा. कडक उन्हामुळे ब्लँकेटचा रंग उडू शकतो आणि ते कडक होऊ शकते.
advertisement










