T20 World Cup : सूर्याचा एकच डिसिजन ठरला गेम चेंजर... टीम इंडियाचं सगळ्यात मोठं टेन्शन मिटलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या करो या मरो सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध धमाका केला आहे. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला उतरलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 256 रन केल्या.
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपच्या करो या मरो सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध धमाका केला आहे. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला उतरलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 256 रन केल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला टीम इंडियाचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. तर या टी-20 वर्ल्ड कपमधला कोणत्याही टीमचा हा सर्वाधिक स्कोअर ठरला आहे.
वर्ल्ड कपच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये संघर्ष करणाऱ्या अभिषेक शर्माने अर्धशतक केलं. अभिषेकने 30 बॉलमध्ये 183.33 च्या स्ट्राईक रेटने 55 रन केले, ज्यात 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर संजू सॅमसनने 24, इशान किशनने 38 आणि सूर्यकुमार यादवने 13 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. हार्दिक पांड्याने 23 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 50 आणि तिलक वर्माने 16 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 44 रन केल्या. तिलकने 275 च्या स्ट्राईक रेटने आणि हार्दिकने 217 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
advertisement
टीम इंडियात बदल
या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले. वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेल आणि रिंकू सिंगऐवजी संजू सॅमसनची टीममध्ये निवड झाली. तसंच टीमने खेळाडूंच्या बॅटिंग पोजिशनमध्येही बदल केले. संजू सॅमसन हा ओपनिंगला आला, तर इशान तिसऱ्या, सूर्या चौथ्या, हार्दिक पाचव्या आणि तिलक सहाव्या क्रमांकावर आला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिलक मिडल ऑर्डरमध्ये संघर्ष करत होता, पण त्याला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय गेम चेंजर ठरला, यामुळे तिलक वर्माला फॉर्ममध्ये यायलाही मदत मिळाली.
advertisement
सुपर-8 च्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला होता, त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आधी झिम्बाब्वे आणि त्यानंतर 1 मार्चला वेस्ट इंडिजचा पराभव करणं गरजेचं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या या डू ऑर डाय सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. एवढा मोठा स्कोअर उभा करून भारतीय टीमने सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
advertisement
दक्षिण आफ्रिकेने दिली लाईफलाईन
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 विकेटने पराभव केला, त्यामुळे सेमी फायनलच्या रेसमध्ये टीम इंडियाला लाईफलाईन मिळाली. सेमी फायनलचं आव्हान कायम ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर विजय मिळवावा अशी प्रार्थना भारतीय टीम करत होती. दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यामुळे आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
Feb 26, 2026 8:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सूर्याचा एकच डिसिजन ठरला गेम चेंजर... टीम इंडियाचं सगळ्यात मोठं टेन्शन मिटलं!









