advertisement

IND vs ZIM : अभिषेकने अर्धशतक ठोकलं पण ट्रॅपमध्ये फसला, रझाने दुखती नस दाबून विकेट काढली

Last Updated:

झिम्बाबेचा कर्णधार सिकंदर रझाने ट्रॅप रचला आणि अभिषेक शर्माला बाद केले. विशेष म्हणजे ज्या बॉलवर अभिषेक बाद झाला ती त्याची वर्ल्डकपमधली सगळ्यात मोठी कमजोर बाजू असल्याचे समोर आले होते.

abhishek sharma
abhishek sharma
India vs Zimbabwe : टीम इंडियाचा तडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्माला अखेर झिम्बाबे विरूद्ध सामन्यात सूर गवसला आहे. आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने 55 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या खेळीनंतर तो शतक करेल अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा होती. पण झिम्बाबेचा कर्णधार सिकंदर रझाने ट्रॅप रचला आणि अभिषेक शर्माला बाद केले. विशेष म्हणजे ज्या बॉलवर अभिषेक बाद झाला ती त्याची वर्ल्डकपमधली सगळ्यात मोठी कमजोर बाजू असल्याचे समोर आले होते. आणि त्याच बॉलवर तो पुन्हा फसला आणि आऊट झाला होता.
खरं तर अभिषेक शर्मा इतर चार सामन्यापैकी आजच्या सामन्यात थोडं गांभीर्याने खेळत होता. कारण मागच्या तीन सामन्यात घाईघाईत सिक्स आणि चौकार खेचण्यात बाद होत होता.त्यामुळे त्याला दिग्गज क्रिकेटपटूंनी मैदानावर थोडा वेळ देऊन खेळण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला मानत त्याने आज संयमीपणे मैदानात खेळायला सूरूवात केली होती. याचा त्याला फायदा झाला होता.
advertisement
दरम्यान संयम राखून खेळल्याने अभिषेक शर्माने 34 बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले होते. त्यानंतर झिम्बाबेकडून टिनोटेंडा मापोसा 13 वी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. यावेळी त्याच्या ओव्हरसा सूर्यकुमार यादने फोर सिक्स मारले. त्यात अभिषेक शर्माने देखील हात धुतले होतेत.त्यानंतर शेवटचा बॉल खेळण्यापूर्वी झिम्बाबेचा कॅप्टन सिंकदर रझा टिनोटेंडा मापोसाजवळ आला आणि त्याने त्याला स्लोव्हर हॉल टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रझाने सांगितल्याप्रमाणे मापोसाने बॉल टाकला आणि अभिषेक ट्रॅपमध्ये अडकला. अभिषेक बॉल मारताना थेट सिंकजर रझाच्या हातात कॅच देऊन बसला आणि त्याची विकेट गमावली.
advertisement
विशेष म्हणजे ज्या बॉलवर अभिषेक शर्मा आऊट झाला होता.तो बॉल स्लोव्हर बॉल होता. याच स्लोव्हर बॉलने अभिषेक शर्मा आणि टीम इंडियाला प्रचंड त्रास दिला आहे.त्यामुळे ज्या स्लोव्हर बॉलवर त्याने संयमाने खेळणे आवश्यक होते, त्याच बॉलवर तो बाद झाला. त्यामुळे अभिषेक शर्मा त्याच्या मागच्या चुकापासून काहीच शिकला नाही आणि सिंकदर रझाने त्याची दुखती नस दाबली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : अभिषेकने अर्धशतक ठोकलं पण ट्रॅपमध्ये फसला, रझाने दुखती नस दाबून विकेट काढली
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement