advertisement

Solapur: पुण्यातून आले आणि घरात घुसून तरुणाला मारलं, गोळी झाडली पण..., सोलापुरातील सिनेस्टाईल घटना

Last Updated:

जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून गोळीबार करण्यात आला. पण, सुदैवाने निशाणा चुकल्यामुळे

News18
News18
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून गोळीबार करण्यात आला. पण, सुदैवाने निशाणा चुकल्यामुळे तरुण थोडक्यात बचावला. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडााली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  बार्शी तालुक्यातील  कुसळंब गावात दुपारच्या सुमारासही धक्कादायक घटना घडली. बाळासाहेब उकिरडे (वय २४) असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेमध्ये हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचाार सुरू आहे. जुन्या वादातून ही घटना घ़डली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
काय घडलं नेमकं? 
बाळासाहेब उकिरडे या तरुणाचं गावात जुना वाद होता.  बाळासाहेब उकिरडे आपल्या घरी झोपलेले होते.आज दुपारच्या सुमारास आरोपी योगेश मोरे आणि पुण्यातून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी बाळासाहेब उकिरडे यांना गाठलं, त्यानंतर या तिन्ही तरुणांनी बाळासाहेब उकिरडे यांना जबर मारहाण केली. या टोळक्यातील एकाने आपल्या जवळील पिस्तुल काढली आणि उकिरड यांच्या  दिशेने गोळीबार केला.  मात्र निशाणा चुकल्याने बाळासाहेब उकिरडे यांना गोळी लागली नाही. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, या तरुणांच्या मारहाणीमध्ये उकिरडे जखमी झाले आहे.
advertisement
स्थानिकांनी धाव घेऊन उकिरडेंना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाास्थळी दाखल झाले.  या घटनेनंतर बार्शीत खळबळ उडाली असून जखमी युवकावर उपचार सुरू आहे तर हल्ला केलेले तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.  त्यांच्या शोधासाठी बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले असून आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: पुण्यातून आले आणि घरात घुसून तरुणाला मारलं, गोळी झाडली पण..., सोलापुरातील सिनेस्टाईल घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement