advertisement

बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, अभिनेत्रींच्या स्रीबिजासाठी कोट्यवधी रुपये!

Last Updated:

स्त्रीबीज तस्करीच्या बातमीमुळे बदलापूरकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं. बदलापूरमध्ये सुरू असलेल्या स्त्रीबीज तस्करीचे संबंध वेगवेगळ्या शहरांसोबत असल्याचं समोर येऊ लागलंय.

स्त्रीबीज तस्करी प्रकरण
स्त्रीबीज तस्करी प्रकरण
मुंबई: बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं. आता या प्रकरणातल्या अनेक धक्कादायक बाबी समोर येताहेत. स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड समोर आलं असून सुंदर महिला आणि अगदी अभिनेत्रींच्या स्रीबिजासाठी कोट्यवधी रुपये मोजले जात असल्याची हादरवणारी बाब समोर आलीय.
स्त्रीबीज तस्करीच्या बातमीमुळे बदलापूरकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं. बदलापूरमध्ये सुरू असलेल्या स्त्रीबीज तस्करीचे संबंध वेगवेगळ्या शहरांसोबत असल्याचं समोर येऊ लागलंय. नशिकमध्ये अधिकृत असलेल्या एक आयव्हीएफ सेंटर ठाण्यात बेकायदेशीरपणे सुरू होतं. ठाणे आणि उल्हासनगरमधील दोन खासगी हॉस्पिटल प्रकर्षाने समोर आले आहेत. त्या माध्यमातून स्त्रीबीज रोपण आणि विक्रीचे बेकायदेशीर कृत्य सुरू होते.
advertisement

कोण कोण आरोपी, कुणावर काय आरोप?

धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी आरोग्य क्षेत्राशी संबंधित नसताना वैद्यकीय प्रक्रियेत सहभागी होत होत्या. तर सुमित सोनकांबळे टोळीचं नियोजन करत होता. आतापर्यंत मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे आणि एजंट सोनल गरेवालला अटक करण्यात आली आहे. एका महिलेकडून तब्बल 33 वेळा स्त्रीबीज घेतल्याचंही उघड झालंय.
advertisement
हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बदलापुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पोलिसांच्या तपासात स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड उघड झालंय.

स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड

गरजू मजूर महिलेचं स्त्री बीज 2 लाख रुपये
सुंदर महिलेचं स्त्री बीज 10 लाख रुपये
मॉडेल महिलेचं स्त्री बीज 25 लाख रुपये
advertisement
खेळाडू महिलेचं स्त्री बीज 10 लाख ते एक कोटीपेक्षा जास्त किंमत
अभिनेत्रीचं स्त्री बीज 25 लाख ते कोट्यवधी रुपयांमध्ये विकलं जायचं.
तर महिला उद्योगपतीचं स्त्री बीज
15 लाख ते काही कोटी रुपये, असा दर होता.

स्त्रीबीज हा ‘प्रीमियम प्रॉडक्ट’ म्हणून विकला जात होता

या व्यवहारात स्त्रीबीज हा ‘प्रीमियम प्रॉडक्ट’ म्हणून विकला जात होता. बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणानं आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर व्यवहाराचं जाळं उघड केलंय. मात्र आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर करून हा प्रकार किती दिवस सुरू होता? कोणत्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. तसंच दोषींवर कारवाई होणंही गरजेच आहे. तरच आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ बंद होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, अभिनेत्रींच्या स्रीबिजासाठी कोट्यवधी रुपये!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement