advertisement

रश्मिका-विजयच्या लग्नाच्या प्रश्नावर 'कांतारा' फेम रिषभ शेट्टीचं धक्कादायक उत्तर, दोन शब्दात संपवला विषय

Last Updated:
एकीकडे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडला आहे, तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एका जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पडताना दिसतेय.
1/9
एकीकडे उदयपूरच्या राजवाड्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडला आहे, तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एका जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पडताना दिसतेय.

2/9
रश्मिकाला सिनेसृष्टीत पहिला ब्रेक देणारे 'किरिक पार्टी' फेम दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी रश्मिकाच्या लग्नावर दिलेल्या प्रतिक्रियेने सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

3/9
एका साध्या प्रश्नाला उत्तर न देता ऋषभने ज्या पद्धतीने काढता पाय घेतला, त्यावरून
एका साध्या प्रश्नाला उत्तर न देता ऋषभने ज्या पद्धतीने काढता पाय घेतला, त्यावरून "ऋषभ अजूनही रश्मिकावर नाराज आहे का?" अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
advertisement
4/9
ऋषभ शेट्टी सध्या त्यांच्या आगामी 'जय हनुमान' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी मंत्रालयममध्ये गेले होते. तिथे मीडियाशी संवाद साधताना त्यांनी चित्रपटावर भरभरून गप्पा मारल्या.

5/9
पण जसा एका पत्रकाराने गुगली टाकला की,
पण जसा एका पत्रकाराने गुगली टाकला की, "सर, आज रश्मिका मंदानाचं लग्न आहे, तुम्हाला निमंत्रण मिळालं का?" तसा ऋषभ यांच्या चेहऱ्यावरील भावच बदलले. त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, फक्त एक तिरकस स्मितहास्य केलं, "थँक्यू" म्हटलं आणि ते तडक तिथून निघून गेले.
advertisement
6/9
ऋषभ शेट्टी यांच्या या शांत राहण्यामागे एक मोठा इतिहास आहे. रश्मिकाने २०१७ मध्ये तिचा पहिला चित्रपट 'किरिक पार्टी' केला होता, ज्याचा हिरो रक्षित शेट्टी होता. रक्षित आणि रश्मिकाची तेव्हा साखरपुडाही झाला होता, पण पुढे तो मोडला. विशेष म्हणजे, रक्षित आणि ऋषभ हे जिवाभावाचे मित्र आहेत.

7/9
खरा वाद पेटला तो २०२३ मध्ये. एका मुलाखतीत रश्मिकाने तिला लॉन्च करणाऱ्या 'परमवाह स्टुडिओ' या रक्षितच्या प्रोडक्शन हाऊसबद्दल बोलताना So called production house म्हटले होते. आपल्या मित्राच्या बॅनरबद्दल असा अनादर पाहून ऋषभ शेट्टी भडकले होते.

8/9
त्यांनीही मग एका मुलाखतीत रश्मिकाचा उल्लेख न करता म्हटलं होतं की,
त्यांनीही मग एका मुलाखतीत रश्मिकाचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, "मला 'या' टाईपच्या अभिनेत्री आवडत नाहीत. मी नवीन मुलींसोबत काम करणं पसंत करतो, ज्या कोणत्याही बॅरिअरशिवाय काम करतात."
advertisement
9/9
उदयपूरमधील रश्मिका आणि विजयचं हे लग्न अत्यंत खाजगी होतं, हे खरं असलं तरी इंडस्ट्रीतील जुन्या मित्रांना आणि गुरुंना निमंत्रण असणं अपेक्षित असतं. पण रश्मिका आणि ऋषभ यांच्यातील हा कोल्ड वॉर पाहता, ऋषभ यांना लग्नाचं निमंत्रण मिळालं नसावं किंवा मिळालं असलं तरी त्यांनी जाणं टाळलं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement