भरजरी दागिने, पांढरी धोती, कपाळी टिळा; लग्नाच्या विधींसाठी विजयचा राजबिंडा रुबाब! अबोली साडीतील रश्मिकाच्या लूकने चोरली लाइमलाईट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vijay Deverkonda-Rashmika Mandanna: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लाडक्या जोडीने अखेर साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
advertisement
1/14

गेली सात वर्षे ज्या लपंडावाचा शेवट काय होणार, याची उत्सुकता संपूर्ण देशाला होती, त्या 'विरोश'च्या (Virosh) प्रेमकहाणीवर आज उदयपूरच्या शाही महालात मोहोर उमटली!
advertisement
2/14
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लाडक्या जोडीने अखेर साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
advertisement
3/14
'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' मधली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार बनले आहेत.
advertisement
4/14
पण, या लग्नात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे या जोडीच्या सुंदर वेडिंग लूकची.
advertisement
5/14
सकाळच्या विधींसाठी विजय देवरकोंडाने अत्यंत साध्या पण तितक्याच प्रभावी पारंपरिक तेलगू पेहराव निवडला होता.
advertisement
6/14
शुभ्र पांढऱ्या रंगाची रेशमी धोती आणि त्याला मॅचिंग असा भरजरी काठाची शाल खांद्यावर टाकून विजय खऱ्या अर्थाने वरराजाच्या रुपात खुलून दिसत होता.
advertisement
7/14
सोनेरी दागिने आणि कपाळावर टिळा लावलेला विजय एखाद्या दाक्षिणात्य राजपुत्रासारखा भासत होता.
advertisement
8/14
रश्मिकाच्या सौंदर्याने तर सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. सकाळी तेलगू विधींसाठी तिने केशरी-सोनेरी रंगाची भरजरी सिल्क साडी नेसली होती, ज्यावर तिने जड सोन्याचे दागिने परिधान केले होते.
advertisement
9/14
मात्र, खरी जादू पाहायला मिळाली ती संध्याकाळच्या विधींमध्ये. रश्मिकाने आपल्या कूर्ग (कर्नाटक) मुळाचा मान राखत कोडावा पद्धतीने साडी नेसली होती.
advertisement
10/14
या साडीचे वैशिष्ठ्य म्हणजे तिचे निऱ्या मागे असतात. विशेष म्हणजे, ही कोडावा साडी रश्मिकाला तिच्या सासूबाईंनी, म्हणजेच विजयच्या आईने प्रेमाची भेट म्हणून दिली होती. या पारंपरिक वेशात रश्मिकाचं सौंदर्य अधिकच सात्विक आणि मोहक दिसत होतं.
advertisement
11/14
लग्नाचे फोटो शेअर करताना रश्मिकाने विजयसाठी एक लांबलचक आणि डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे.
advertisement
12/14
ती म्हणते, "हाय माझ्या प्रिय लोकांनो, भेटा माझ्या नवऱ्याला – मिस्टर विजय देवरकोंडा! ज्या माणसाने मला श्वास घ्यायला शिकवलं, स्वप्न पाहायला बळ दिलं, तो आज माझा झालाय. विज्जू, तू सोबत आहेस म्हणून माझ्या संघर्षाला अर्थ मिळाला आहे. तुझी बायको म्हणून मिरवायला मला खूप अभिमान वाटतोय."
advertisement
13/14
सात वर्षांच्या डेटिंगनंतर या दोघांनी आपल्या लग्नाला चाहत्यांनी दिलेलं 'द वेडिंग ऑफ विरोश' असंच नाव दिलं.
advertisement
14/14
विजयनेही आपली भावना व्यक्त करताना म्हटलं की, "एके दिवशी मला तिची खूप आठवण आली, इतकी की तिच्याशिवाय घासही घशाखाली उतरत नव्हता. मग ठरवलं, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे तिलाच माझी पत्नी बनवायचं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भरजरी दागिने, पांढरी धोती, कपाळी टिळा; लग्नाच्या विधींसाठी विजयचा राजबिंडा रुबाब! अबोली साडीतील रश्मिकाच्या लूकने चोरली लाइमलाईट