TRENDING:

Mumbai Rain: श्रावण संपताच वारं फिरलं, कोकणात हवा बदलली, मुंबईत पाऊस की उघडीप?

Last Updated:
Mumbai Rain: श्रावण महिना संपताच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह कोकणातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
Mumbai Rain: श्रावण संपताच वारं फिरलं, कोकणात हवा बदलली, मुंबईत पाऊस की उघडीप?
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर व मुंबई परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात थोडी उकाड्याची चाहूल लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे, आणि त्यातच आज 23 ऑगस्ट 2025 रोजी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी नाही. बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही.
advertisement
2/5
मुंबईत आज हवामान तुलनेने स्थिर राहील. काही ठिकाणी हलक्या सरा होतील, पण दिवसाचा बहुतांश भाग कोरडा असेल. कोणताही अलर्ट नाही. सकाळी सौम्य गारवा असेल, दुपारनंतर थोडं उन्हं डोकावेल. रात्री पुन्हा तुरळक पावसाच्या सरी दिसू शकतात. तापमान 27 अंश ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत राहील.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरातही आज पावसाची तीव्रता खूपच कमी असेल. काही भागांत हलक्या रिमझिम सरा होतील, तर इतर ठिकाणी पूर्णपणे कोरडं हवामान राहू शकतं. कोणताही अलर्ट नाही. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात कालच्या तुलनेत आज पावसाची तीव्रता आणखी कमी होईल. सकाळच्या सत्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर दुपारी व संध्याकाळी तुरळक हलका पाऊस पडेल. अलर्ट नाही. तापमान 25 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसानंतर आज हवामान शांत असेल. काही भागांत हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात, मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. संपूर्ण कोकणात आज कोणताही अलर्ट नाही. तापमान 26 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: श्रावण संपताच वारं फिरलं, कोकणात हवा बदलली, मुंबईत पाऊस की उघडीप?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल