T20 World CUP : नेट रनरेट आणि गणितांचा खेळ संपला, आता भारत थेट सेमी फायनलला जाणार,कसं बदललं समीकरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वेस्ट इंडिजच्या पराभवाने भारताचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग सूकर झाला आहे. नेमका तो कसा झाला आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/6

टी20 वर्ल्डकपमध्ये आज साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. या पराभवाचा आनंद भारताच्या ड्रेसिंग रूमध्ये साजरा केला जात आहे.कारण वेस्ट इंडिजच्या पराभवाने भारताचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग सूकर झाला आहे.
advertisement
2/6
वेस्ट इंडीजने दिलेल्या 177 धावांच्या यशस्वी पाठलाग करून साऊथ आफ्रिकेने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.आफ्रिकेटच्या या विजयाने कॅप्टन एडन मार्करमने 82 धावांची आणि रॅन रिकल्टने 45 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने सामना जिंकला होता.
advertisement
3/6
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या पराभवानंतर भारताला मोठा फायदा झाला आहे. कारण या पराभवाने आता नेट रनरेट आणि गणितांचा खेळ संपला आहे. आता फक्त गुणांच्या बळावर सेमी फायनलला पोहोचता येणार आहे.
advertisement
4/6
त्यामुळे जर आज भारताने झिम्बाबेचा पराभव केला तर त्यांचे 2 सामन्यात 2 गुण होणार आहेत. त्यानंतर पुढचा सामना 1 मार्चला होणार आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला हरवले तर ते थेट सेमी फायलला पोहोचतील.
advertisement
5/6
कारण वेस्ट इंडिजच्या साऊथ आफ्रिका आणि भारता विरूद्धच्या पराभवानंतर त्यांचे सामने 3 सामन्यात 2 गुण असल्याने ते आपसूकच सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील.
advertisement
6/6
तर भारतानंतर आणि वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने साऊथ आफ्रिका 4 गुणांसह सेमी फायनलला पोहोचण्याची शक्यता आहे. शक्यता यासाठी कारण त्यांना भारत वेस्ट इंडीज सामन्याचा निकाल पाहावा लागणार आहे. जर भारत जिंकला तर साऊथ आफ्रिका भारताच स्थान पक्क आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World CUP : नेट रनरेट आणि गणितांचा खेळ संपला, आता भारत थेट सेमी फायनलला जाणार,कसं बदललं समीकरण