TRENDING:

T20 World Cup : टीम इंडियाची धाकधूक वाढली, वेस्ट इंडिजची पॉवर हिटिंग, आफ्रिका पुन्हा चोक!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजने धडाकेबाज बॅटिंग करत जोरदार कमबॅक केला आहे, त्यामुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.
advertisement
1/6
टीम इंडियाची धाकधूक वाढली, वेस्ट इंडिजची पॉवर हिटिंग, आफ्रिका पुन्हा चोक!
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण वेस्ट इंडिजने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 रन काढले.
advertisement
2/6
वेस्ट इंडिजची ही आक्रमक बॅटिंग फार काळ टिकली नाही, कारण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोरदार कमबॅक करत वेस्ट इंडिजला एकामागोमाग एक धक्के दिले, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला, पण हा जल्लोष फार काळ टिकला नाही.
advertisement
3/6
पहिले बॅटिंग करणाऱ्या वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 176/8 पर्यंत मजल मारली. 83 रनवरच वेस्ट इंडिजने 7 विकेट गमावल्या होत्या, पण रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी धुवांधार बॅटिंग केली, शेफर्डने 37 बॉलमध्ये नाबाद 52 आणि होल्डरने 31 बॉल 49 रनची खेळी केली.
advertisement
4/6
आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचं हे आव्हान पार करून विजय मिळवला तर टीम इंडियाला सगळ्यात मोठा दिलासा मिळेल, कारण भारतीय टीमचा सेमी फायनलचा दरवाजा उघडेल.
advertisement
5/6
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आणि भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या टीम सेमी फायनलला पोहोचतील, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा विजय टीम इंडियासाठी गरजेचा आहे.
advertisement
6/6
टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना संध्याकाळी 7 वाजता चेन्नईमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला तर भारतासाठी नेट रनरेट हा मुद्दाच राहणार नाही. या परिस्थितीमध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून भारतीय टीम सेमी फायनलला पोहोचेल, कारण वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे 2 पॉईंट्सच राहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाची धाकधूक वाढली, वेस्ट इंडिजची पॉवर हिटिंग, आफ्रिका पुन्हा चोक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल