आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल तक्रार केल्यानं त्याक्षणी तुम्हाला बरं वाटतं, पण मेंदूला हे आवडत नाही. तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेलच असं नाही. वारंवार तक्रार करण्याची सवय तुमच्या मेंदूवर परिणाम करते. वाचून आश्चर्य वाटू शकतं पण असं होतं हे मात्र खरं आहे.
यतक्रार करणे ही केवळ एक नकारात्मक सवय नाही तर ती मेंदूच्या रचनेतही बदल घडवून आणते. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करत असाल तर ही माहिती पूर्ण वाचा.
advertisement
न्यूरल पाथवे - आपला मेंदू एखाद्या कामावर खर्च होणारा वेळ आणि ऊर्जा कमीत कमी करू इच्छितो. जेव्हा तुम्ही वारंवार तक्रार करता तेव्हा तुमचा मेंदू नकारात्मक विचार वाहून नेणाऱ्या न्यूरॉन्समधील संबंध मजबूत करतो. Sixth law of learning मधे जसं law of intensity समजावून सांगितला जातो. तुम्ही जे वारंवार करता त्यावर मेंदूचा ताबा असतो, म्हणजेच त्याचा प्रभाव मेंदूवर दीर्घकाळ राहतो. हळूहळू, तुमचा मेंदू सकारात्मक गोष्टींऐवजी दोष शोधण्यात व्यस्त होतो.
Joints Pain : तारुण्यातही जाणवू शकते सांधेदुखी, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
हिप्पोकॅम्पसचं आकुंचन - वारंवार तक्रार केल्यानं शरीर तणाव संप्रेरक सोडतं. वाढलेल्या कोर्टिसोल पातळीमुळे मेंदूच्या हिप्पोकॅम्पसचं नुकसान होऊ शकतं. मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग शिकणं, तर्कशास्त्र आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असतो. सतत तक्रार केल्यानं हा भाग हळूहळू आकुंचन पावू शकतो, ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
काम करण्याची क्षमता कमी होणं - तुम्ही तक्रार करता तेव्हा तुमची लढण्याची किंवा पळून जाण्याची प्रतिक्रिया सक्रिय होते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतात. दीर्घकालीन ताणामुळे केवळ मेंदूचं कार्य कमी होत नाही तर हृदयरोग आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचा धोका देखील वाढतो.
Lemon Grass : गवती चहाची रंगत, चवीबरोबरच प्रकृतीसाठीही आरोग्यकारक
सेकंड हँड कम्पेंलिनिंग - मेंदूमधे मिरर न्यूरॉन्स असतात. आपण सतत तक्रार करणाऱ्या एखाद्या व्यक्तीभोवती बसतो तेव्हा आपला मेंदू नकळतपणे त्यांच्या भावनांची नक्कल करू लागतो. याचा अर्थ असा की इतरांच्या तक्रारी ऐकणं हे तुमच्या मेंदूसाठी स्वतःच्या तक्रारीइतकंच हानिकारक आहे. यामुळे तुमची मानसिक ऊर्जा कमी होते.
ही सवय कशी बदलण्यासाठी काय करायचं ?
समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, उपायांबद्दल बोला. म्हणजेच त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार तक्रारीपेक्षा जास्त करा.
कृतज्ञता - दररोज ज्या तीन गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्या लिहा. हा सराव मनाला सकारात्मक मार्ग तयार करण्यास प्रोत्साहित करतो.
लक्षात ठेवा - तक्रार करायला सुरुवात करताच, स्वतःला थांबवा आणि ही तक्रार योग्य आहे का याचा विचार करा. जर नसेल तर थांबा. याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होईल.
