पार्सल देण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्...
मिळालेली माहिती अशी की, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी गोकुळनगर परिसरात ही घटना घडली. आरोपींनी सार्थक राजाराम पाटील (२०) याला जुन्या भांडणाचा राग मनात धरून 'पार्सल द्यायचे आहे' असे सांगून बोलावले. सार्थक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याची गाडी अडवून त्याला जबरदस्तीने आपल्या वाहनावर बसवून त्याचे अपहरण केले.
advertisement
जीवे मारण्याची धमकी आणि जबरी चोरी
आरोपींनी सार्थकला पर्वती परिसरातील लक्ष्मीनारायण थिएटर आणि मित्र मंडळ चौक येथे नेले. तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. "आमच्याशी पंगा घेतोस काय? आज तुला आणि तुझ्या मित्राला खल्लास करतो," अशी धमकी देत आरोपींनी सार्थकला त्याचा मित्र प्रतीक पाटील याला बोलावण्यास भाग पाडले. प्रतीक तिथे आल्यावर आरोपींनी त्याचा २० हजार रुपयांचा मोबाईल आणि गाडीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली.
तिघे अटकेत, तीन अल्पवयीन ताब्यात
येवलेवाडी पोलिसांनी या प्रकरणात शाहू पोपट निंबाळकर (१९), सोहम राहुल पारखे (१९) आणि सनी संजय दुसुंगे (२०) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांवर यापूर्वीही किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीने केलेल्या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
