Health Tips : तुम्हालाही सतत घाम येतो? हे प्राणायाम लगेच कराल, दिसेल लगेच फायदा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
यामध्ये काही लोग असे असतात ज्यांना फॅन सुरू असताना देखील घाम येतो. पण तुम्हाला माहितीये का शरीरातील उष्णता कमी जास्त झाल्यास हा त्रास होऊ शकतो.
advertisement
1/5

अनेक असे लोग असतात त्यांना सतत घाम येत असतो. यामध्ये काही लोग असे असतात ज्यांना फॅन सुरू असताना देखील घाम येतो. पण तुम्हाला माहितीये का शरीरातील उष्णता कमी जास्त झाल्यास हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यावर कोणते उपाय करावे? कोणते प्राणायाम करावे? याबद्दलच योग शिक्षिका सोनाली लोखंडे यांनी दिली आहे.
advertisement
2/5
योग शिक्षिका सोनाली लोखंडे सांगतात की, फॅन सुरू असताना देखील ज्यांना जात घाम येतो. त्यांच्या शरीरातील उष्णतेची पातळी वाढलेली असते. त्यामुळे त्यांना अति घाम येतो.
advertisement
3/5
त्यामुळे तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करू शकता. चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीतून सोडणे. त्यामुळे आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह होऊन आपल्या शरीरातील उष्णता बॅलन्स होते, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
4/5
तसेच सोनाली लोखंडे सांगतात की, सतत थंडी वाजते. त्यांना घाम कधीच येत नाही. अशावेळी शरीरातील उष्णतेची लेव्हल कमी झालेली असते. ती बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सुर्यभेदी प्राणायाम करू शकता. यामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे.
advertisement
5/5
जास्त घाम येत असल्यास चंद्रभेदी आणि घाम येत नसल्यास सूर्यभेदी प्राणायाम तुम्ही करू शकता. तसेच प्राणायाममुळे शरीराला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे होतात. पचन सुधारते, तणाव कमी होतो, मनःशांती मिळते, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : तुम्हालाही सतत घाम येतो? हे प्राणायाम लगेच कराल, दिसेल लगेच फायदा