TRENDING:

Maruti ची Wagon R हत्तीने उचलून फेकून दिली, कोल्हापुरी हत्ती जोमात, गावकरी कोमात, गावातले PHOTOS

Last Updated:
मागील अनेक वर्षांपासून जंगली हत्तींनी मानवी वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातला आहे. अशातच चंदगड तालुक्यात हत्तींनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. हत्तीने मारुती सुझुकीची वॅगनर आर ही उचलून फेकली आहे. (ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी)
advertisement
1/6
Maruti Wagon R हत्तीने उचलून फेकून दिली,कोल्हापुरी हत्ती जोमात,गावकरी कोमात
कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून जंगली हत्तींनी मानवी वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातला आहे. अशातच चंदगड तालुक्यात हत्तींनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. हत्तीने मारुती सुझुकीची वॅगनर आर ही उचलून फेकली आहे.
advertisement
2/6
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून जंगली हत्ती पाहण्यास मिळत आहे. उमगाव जवळच्या खळणेकरवाडीत हत्तीकडून वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
3/6
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील उमगाव जवळच्या खळणेकरवाडीमध्ये रात्री हत्तींनी शिरकाव केला. हत्तींनी समोर येईल त्या गाड्यांची तोडफोड केली.
advertisement
4/6
हत्तीच्या हल्ल्यात चार चाकीसह तीन दुचाकींचं नुकसान झालं आहे. गावात उभी असलेल्यी एक Maruti Suzuki Wagon R हत्तीच्या तावडीत सापडली. हत्तीने ही कार उचलून फेकली.
advertisement
5/6
हत्तीच्या हल्ल्यात Maruti Suzuki Wagon R कारचं नुकसान झालं आहे. कारच्या मागील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
advertisement
6/6
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाात भेट देऊन पंचनामा केला आहे. किती गाड्यांचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी केली. तसंच, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी शिवारात न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maruti ची Wagon R हत्तीने उचलून फेकून दिली, कोल्हापुरी हत्ती जोमात, गावकरी कोमात, गावातले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल