TRENDING:

तान्या मित्तलला लॉटरी, झाली एकता कपूरची हिरोईन; आनंदाच्या भरात खाऊ घातला दुबईचा खास पदार्थ, VIDEO

Last Updated:

बिग बॉस 19 फेम तान्या मित्तल एकता कपूरची हिरोईन झाली आहे. तिनं एकताला आनंदाच्या भरात बकलावा खाऊ घातला. व्हिडीओ एकदा पाहाच.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस 19 मध्ये आपल्या फॅशनने आणि मोठ मोठ्या गप्पांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या तान्या मित्तलला मोठी लॉटरी लागली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तान्या काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. आता तान्याला लॉटरी लागली आहे. तान्या मित्तल थेट एकता कपूरची हिरोईन झाली आहे. एकता कपूरने तान्याला तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. तान्याने एकता कपूरबरोबर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची चाहत्यांना दिली आहे.
News18
News18
advertisement

तान्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तान्या म्हणतेय. "कोणीतरी मला सांगितलं होतं की स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत, पण मी कोणासोबत उभी आहे बघा? मॅम तुम्हाला मला भेटून कसं वाटलं?"

( चेहऱ्यावर राग आणि उदासीनता! लग्नानंतर रश्मिका-विजयचा हा Photo Viral, काय आहे याची स्टोरी? )

advertisement

यानंतर एकता म्हणते, "मला असं वाटलं की तान्या, मी तर शोच्या आतच तुम्हाला रोलची ऑफर दिली होती. इथपर्यंत यायला तुम्हाला खूप वेळ लागला." त्यावर तान्या म्हणाली, "म्हणजे तुम्ही मला काम देत आहात का?" एकता उत्तर देत म्हणाली, "मी तुम्हाला आत्ताच सांगते की माझ्याकडे तुमच्यासाठी लेखी ऑफर आहे. तुमच्यासोबत काम करण्याची मी वाट पाहत आहे."

advertisement

तान्या पुढे विचारते, म्हणजे मी हिरोईन बनेन ना? त्यावर एकचा म्हणाली. हो नक्कीच. तू माझ्यासाठी जेवढी गिफ्ट्स घेऊन आली त्यासाठी धन्यवाद. तुमची फॅमिली खूप छान आहे. मला आशा आहे की आपलं हे रिलेशन खूप काळ टिकेल. एका कुटुंबासारखा असोसिएशन असेल."

तान्याने एकता कपूरच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तिच्यासाठी UNO कार्ड्सचे अनेक प्रकार ती घेऊन गेली होती. त्याचप्रमाणे दुबईचा बकलावा देखील तिनं एकताला दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजान स्पेशल, दिल्ली फेमस मोहब्बत शरबत घरी कसा बनवायचा? रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

तान्या मित्तलने बिग बॉसमध्ये अनेक मोठे मोठे दावे केले होते. लोकांनी तिला खोटारडी म्हटलं होतं. पण बाहेर येऊन तान्याला आता लॉटरीच लागली आहे. तान्या जवळपास 2 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. इन्स्टाग्रामवरून ती कोटींची कमाई करते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
तान्या मित्तलला लॉटरी, झाली एकता कपूरची हिरोईन; आनंदाच्या भरात खाऊ घातला दुबईचा खास पदार्थ, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल