रमजान स्पेशल, दिल्ली फेमस मोहब्बत शरबत घरी कसा बनवायचा? रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रमजान महिन्यात इफ्तारसाठी ऊर्जा देणारे आणि शरीराला थंडावा देणारे पेय अधिक महत्त्वाचे ठरते. अशा वेळी दिल्लीमध्ये प्रसिद्ध असलेला मोहब्बत शरबत हा अनेकांचा आवडता पर्याय आहे.
मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागली की थंडगार आणि गोड पेयांची आठवण हमखास येते. विशेषतः पवित्र रमजान महिन्यात इफ्तारसाठी ऊर्जा देणारे आणि शरीराला थंडावा देणारे पेय अधिक महत्त्वाचे ठरते. अशा वेळी दिल्लीमध्ये प्रसिद्ध असलेला मोहब्बत शरबत हा अनेकांचा आवडता पर्याय आहे. जुने बाजार, खाद्यगल्ल्या आणि रमजानच्या खास स्टॉल्सवर मिळणारे हे रंगीत, गोड आणि ताजेतवाने पेय आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीही बनवू शकता. चला तर मग, दिल्लीमध्ये प्रसिद्ध असलेला हा खास मोहब्बत शरबत घरच्या घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
मोहब्बत शरबत रेसिपी साहित्य:
2 कप थंड दूध, 2 टेबलस्पून रूह अफझा (गुलाब सिरप), 2 टेबलस्पून साखर (चवीनुसार), 2 टेबलस्पून बारीक चिरलेले टरबूज, 1 टेबलस्पून भिजवलेली सब्जा (तुळशी) बिया, बर्फाचे तुकडे हे साहित्य लागेल.
advertisement
मोहब्बत शरबत कृती:
1. सर्वप्रथम सब्जा बिया 10–15 मिनिटे पाण्यात भिजवून फुलवून घ्या.
2. एका मोठ्या भांड्यात थंड दूध घ्या.
3. त्यात रूह अफझा आणि साखर घालून चांगले हलवा.
4. आता त्यात भिजवलेल्या सब्जा बिया आणि बारीक चिरलेले टरबूज घाला.
5. शेवटी बर्फाचे तुकडे टाकून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा.
advertisement
6. थंडगार ग्लासमध्ये ओता आणि लगेच सर्व्ह करा.
टिप्स:
अधिक क्रीमी चव हवी असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालू शकता. वरून ड्रायफ्रूट्स (पिस्ता/बदाम काप) घातल्यास चव वाढते. जास्त थंडावा हवा असल्यास सर्व साहित्य आधीच फ्रीजमध्ये ठेवा. इफ्तारसाठी ऊर्जा देणारा, शरीराला थंडावा देणारा आणि दिसायलाही आकर्षक असा हा मोहब्बत शरबत नक्की करून पाहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 7:08 PM IST




