TRENDING:

PAK vs SL :जिंकली तर नुकसान हारली तर पैशांचा पाऊस, श्रीलंका मोठ्या धर्मसंकटात

Last Updated:
पाकिस्तानसोबत श्रीलंकेसाठी देखील हा सामना खूप महत्वाचा आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल यजमान श्रीलंका तर वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. मग त्यांच्यासाठी हा सामना का महत्वाचा आहे?
advertisement
1/9
PAK vs SL :जिंकली तर नुकसान हारली तर पैशांचा पाऊस, श्रीलंका मोठ्या धर्मसंकटात
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 8 मधला शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्याला पल्लीकेलेच्या मैदानावर सूरुवात होणार आहे.
advertisement
2/9
हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण पाकिस्तानला आज सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठ्या धावाने पराभव करावा लागणार आहे.
advertisement
3/9
पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी करताना जर 160 धावा केल्या.तर त्यांना 95 धावांवर श्रीलंकेला ऑलआऊट करावं लागेल.म्हणजेच पाकिस्तानला श्रीलंकेचा 64 हून अधिक धावांनी पराभव करावा लागणार आहे.
advertisement
4/9
जर समजा श्रीलंकेने 160 धावांचे लक्ष्य ठेवले तर पाकिस्तानला ते 13.1बॉलमध्ये हे लक्ष्य गाठावे लागणार आहे. तसे करून पाकिस्तान ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला रनरेटमध्ये मागे टाकून सेमी फायनलला पोहोचू शकते.त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना निर्णायक आहे.
advertisement
5/9
पाकिस्तानसोबत श्रीलंकेसाठी देखील हा सामना खूप महत्वाचा आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल यजमान श्रीलंका तर वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. मग त्यांच्यासाठी हा सामना का महत्वाचा आहे?
advertisement
6/9
त्याचं झालं असं आहे की स्पर्धेच्या दृष्टीने या सामन्याला श्रीलंकेच्या लेखी फारशी किंमत नाही आहे. पण यजमान म्हणून श्रीलंकेसाठी हा मोठा सामना आहे. कारण श्रीलंकेची आर्थिक गणिते या सामन्यावर अवलंबून आहेत.
advertisement
7/9
कारण जर का या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला तर अशा परिस्थितीत सेमी फायनल आणि फायनल भारतात शिफ्ट केल्या जातील. कारण सेमी फायनल आणि फायनलला पाकिस्तान नसणार आहे. त्यामुळे हा निकाल श्रीलंकेला आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असणार आहे.
advertisement
8/9
पण जर श्रीलंका हारली आणि पाकिस्तान नेट रनरेट जुळवून सेमी फायनलला पोहोचली तर श्रीलंकेला आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे. कारण सेमी फायनल ही श्रीलंकेत खेळवल जाईल आणि फायनल देखील तिकडेच होईल. पाकिस्तान आणि भारत नॉकआऊटमध्ये पोहोचले तर फायनल या दोन देशात कोलंबोमध्ये खेळवला जाईल.
advertisement
9/9
या सामन्यातून गेट मनी, हॉटेल बुकिंग, पर्यटन आणि प्रसारण या माध्यमातून लक्षणीय उत्पन्न मिळू शकते. एका हाय-व्होल्टेज सामन्यामुळे श्रीलंकेच्या बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.त्यामुळे आता श्रीलंकेला पैशासाठी मॅच हारणार की प्रतिष्ठेसाठी जिंकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL :जिंकली तर नुकसान हारली तर पैशांचा पाऊस, श्रीलंका मोठ्या धर्मसंकटात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल