TRENDING:

OTT Film : फॅमिली-मुलं सोडा, बायकोसोबतही ओटीटीवरील या 5 फिल्म्स पाहू नका; चुकूनही पाहिलात तर...

Last Updated:
OTT Couple Film : काही फिल्म्स अशा असतात ज्या कुटुंब किंवा मुलांसोबत पाहता येत नाहीत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशाही काही फिल्म्स आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बायकोसोबतही पाहू नयेत. या फिल्म्स बायकोसोबत पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं. ओटीटीवरील अशा 5 फिल्म्सची ही यादी.
advertisement
1/11
फॅमिली-मुलं सोडा, बायकोसोबतही OTTवरील 5 फिल्म पाहू नका; चुकूनही पाहिलात तर...
शनिवार, रविवार आणि नंतर मधला सोमवारी रजा टाकून त्यानंतर होळी, धुलिवंदन अशी सुट्टी आणि एकमेकांना वेळ देण्याचा विचार... तुम्हा नवरा-बायकोचाही असा प्लॅन आहे का? यात ओटीटीवर एकत्र फिल्म्स पाहण्याचा विचार करत आहात का? तर आधीच आम्ही तुम्हाला सावध करत आहोत. ओटीटीवरील अशा 5 फिल्म्स ज्या बायकोसोबत चुकूनही पाहू नका, नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. या फिल्म्स कोणत्या आणि त्या बायकोसोबत पाहण्याचे काय परिणाम आहेत ते आता पाहुयात.
advertisement
2/11
द ग्रेट इंडियन किचन : ही फिल्म किचनमध्ये बंदिस्त एका महिलेच्या नीरस आणि थकवणाऱ्या जीवनाचे चित्रण करते. जिथं तिला फक्त सेवा करणाऱ्या मशीनसारखं वागवलं जातं. यात निमिषा सजयन, सूरज वेंजारामूडू आहेत.
advertisement
3/11
ही फिल्म प्राइम व्हिडीओवर आहे. ज्याला आयमडीबीचं 8.1 रेटिंग आहे. आता ही फिल्म बायकोसोबत का पाहू नये, तर जर तुम्ही घरातील कामं वाटून घेतली नाहीत, तुमच्या पत्नीने दिवसभर फक्त स्वयंपाक करावा अशी अपेक्षा केली तर हा चित्रपट तुम्हाला खूप अस्वस्थ करेल.
advertisement
4/11
जया जया जया जया हे : ही साऊथ इंडियन फिल्म एक डार्क कॉमेडी आहे. ज्यात जया नावाची महिला घरगुती हिंसाचाराची बळी ठरते. तिचा नवरा तिला क्षुल्लक गोष्टींवरून मारहाण करतो. सुरुवातीला जया हे सहन करते, कारण तिला वाटतं की ही प्रत्येक संसारात होणारी एक सामान्य घटना आहे. पण नंतर ती ते थांबवण्याचा निर्णय घेते. जया स्वसंरक्षण शिकते आणि तिच्या नवऱ्याला मारहाण करू लागते.
advertisement
5/11
जियो हॉटस्टारवरील ही फिल्म ज्याचं आयएमडीबी रेटिंग 7.7 आहे. जर तुम्हाला तुम्हीही तुमच्या पत्नीला धमकावत असेल तर या फिल्ममधील अॅक्शन सीन्स पाहून तुम्हाला चांगलाच घम फुटेल.
advertisement
6/11
इंग्लिश विंग्लिश : श्रीदेवी आणि आदिल हुसेन यांची ही फिल्म. ज्यात शशी एक साधी गृहिणी, जिला इंग्रजी येत नसतं, तिला तिच्या पती आणि मुलीकडून तुच्छ लेखलं जातं. पण ती गुपचूपपणे एक कोर्स करते आणि तिचा गमावलेला आदर परत मिळवते.
advertisement
7/11
जिओ सिनेमावर असलेली ही फिल्म ज्याचं आयएमडीबी रेटिंग 7.8 आहे.  जर तुम्हीही तुमच्या पत्नीमधील उणीव, कमतरतांची खिल्ली उडवत असाल तर ही फिल्म तुम्हाला तुमच्या असंवेदनशीलतेचा आरसा दाखवेल.
advertisement
8/11
थप्पड : तापसी पन्नू आणि पावेल गुलाटीची ही फिल्म. ज्यात एखादा पती पार्टीत आपल्या पत्नीला थप्पड मारतो तेव्हा एक आनंदी वैवाहिक जीवन कसं उद्धवस्त होतं, हे दाखवण्यात आलं आहे.
advertisement
9/11
प्राइम व्हिडीओवरील ही फिल्म ज्याचं आयएमडीबी रेटिंग 7.0 आहे. लग्नात फक्त हात धरून राहणं म्हणजे प्रेम किंवा हक्क आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर या फिल्ममुळे  तुमचा अहंकार दुखावेल.
advertisement
10/11
मिसेज :  सान्या मल्होत्रा, निशांत दहिया यांची ही फिल्म, एक नृत्य शिक्षिका जिची ओळख लग्नानंतर किचनपुरतीपुरती मर्यादित असते. एके दिवशी ती असं काही करते जे तिचा नवरा आणि सासऱ्यांना आयुष्यभर लक्षात राहिल.
advertisement
11/11
झी5 वर ही फिल्म आहे. ज्याचं आयएमडीबी रेटिंग 6.7 आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या स्वप्नांची खिल्ली उडवत असाल आणि तिने फक्त किचन सांभाळावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही फिल्म तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Film : फॅमिली-मुलं सोडा, बायकोसोबतही ओटीटीवरील या 5 फिल्म्स पाहू नका; चुकूनही पाहिलात तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल