Bigg Boss Marathi 6 : भाऊचा धक्का! उद्या नाही आजच Elimination; हा सदस्य 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात रविवारऐवजी शनिवारीच एलिमिनेशन करत रितेश देशमुखने मोठा धक्का दिला आहे. त्या सदस्याचं नावही समजलं आहे.
advertisement
1/5

वीकेंड आला की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार याची धाकधूक सगळ्यांना लागून राहिलेली असते. आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी घरातील एक सदस्य घरातून बाहेर पडतो. पण यावेळी मात्र रविवारी नाही तर शनिवारीच एलिमिनेशन होतं आहे. म्हणजे शनिवारीच घरातील एक सदस्य घरातून बाहेर पडणार आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी सीझन सहाच्या सातव्या आठवड्यात भाऊचा धक्कावर मोठा धक्का मिळाला आहे. उद्या नाही तर आजरच एलिमेनशन होणार आहे, अशी घोषणा रितेश देशमुखने केली. त्यानंतर एलिमेनशनसाठी नॉमिनेट झालेले चार सदस्य उभे राहिले.
advertisement
3/5
एव्हिक्शनची टांगती तलवार ज्या सदस्यांवर आहे, त्यांच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे, राखी सावंत, रोशन भजनकर आणि राकेश बापट यांचा समावेश आहे. या सदस्यांकडूनच रितेशने कोण एलिमिनेट होणार हे जाणून घेतलं. प्रोमोमध्ये 4 पैकी 3 सदस्यांनी रोशन भजनकरचं नाव घेतलं आहे.
advertisement
4/5
राकेशने प्राजक्ताचं नाव घेतलं. तर राखी, प्राजक्ताने रोशनचं. आश्चर्य म्हणजे रोशननेही खुद्द स्वत:चं नाव घेतलं. सोशल मीडियावरील त्याच्याच नावाची चर्चा होती.
advertisement
5/5
एक सामान्य माणूस आणि बॉडीबिल्डर, ज्याने शांत आणि संयमित खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेय घरात इतर सदस्यांसोबत त्याचे थोडेफार वाद झाले. मात्र राखी सावंतच सतत हमाल बोलणं त्यांच्या मनाला लागलं. त्याचा बिग बॉसच्या घरातला प्रवास इथेच थांबलेला बघायला मिळाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : भाऊचा धक्का! उद्या नाही आजच Elimination; हा सदस्य 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर