PAK vs SL : पाकिस्तानला 13.2 ओव्हरमध्येच जिंकावी लागेल मॅच, कसं असेल सेमीफायनलचं रोमांचक समीकरण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PAK vs SL NRR situation for Pakistan : न्यूझीलंडचं भवितव्य आजच्या श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचवरून ठरणार आहे. या दोन्ही संघाचा आज सामना श्रीलंकेच्या कँडी स्टेडियमवर खेळवला जाईल.
advertisement
1/7

आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवल्याने आता न्यूझीलंडची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
न्यूझीलंडचं भवितव्य आजच्या श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचवरून ठरणार आहे. या दोन्ही संघाचा आज सामना श्रीलंकेच्या कँडी स्टेडियमवर खेळवला जाईल. अशातच आज तिसरा सेमीफायनलिस्ट मिळेल.
advertisement
3/7
इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमध्ये जिवंत राहिली आहे. अशातच आज फक्त पाकिस्तानला विजय मिळवण्याची गरजच नाही तर मोठ्या मार्जिनने विजय मिळवावा लागेल.
advertisement
4/7
जर आज श्रीलंकेने 160 धावा उभ्या केल्या तर पाकिस्तानला हा सामना 40 बॉल राखून म्हणजेच 13.2 ओव्हरमध्येच जिंकावा लागणार आहे. पण असं झालं नाही तर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये जाईल.
advertisement
5/7
तसेच जर पाकिस्तानची पहिली बॅटिंग आली आणि पाकिस्तानने 160 धावा उभ्या केल्या तर त्यांना श्रीलंकेवर 64 हून अधिक धावांनी विजय मिळवावाच लागणार आहे. नाहीतर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये जाईल.
advertisement
6/7
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी तगडी फाईट असणार आहे. श्रीलंकेच्या हातात आता पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं भवितव्य असणार आहे.
advertisement
7/7
पण श्रीलंका पाकिस्तानला मोठ्या मार्जिननेच काय... तर मॅच सुद्धा जिंकून देणार नाही, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानला आता मोठ्या रणनितीवर काम करण्याची गरज दिसून येतीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तानला 13.2 ओव्हरमध्येच जिंकावी लागेल मॅच, कसं असेल सेमीफायनलचं रोमांचक समीकरण?