TRENDING:

ऑटोग्राफ घ्यायला आली अन् पहिल्या नजरेतच आवडली, मग 27 वर्षे केला संसार; थलापति विजयची फिल्मी Love Story

Last Updated:
Thalapathy Vijay Love Story : थलापति विजय आणि संगीता यांच्या डिवोर्सची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. दोघांनी 27 वर्षांचा संसार केला. दोघांची पहिली भेट कुठे झाली होती माहितीये? फिल्मी आहे थलापति विजयची लव्ह स्टोरी.
advertisement
1/9
ऑटोग्राफ घ्यायला आली अन् पहिल्या नजरेतच आवडली, थलापति विजयची फिल्मी Love Story
साऊथचा लोकप्रिय अभिनेता थलापति विजयचा तब्बल 27 वर्षांचा संसार मोडला आहे. थलापति विजयची बायको संगीतानं हिनं कोर्टा धाव घेतली असून डिवोर्स फाइल केला आहे. संगीताने अभिनेता विजयवर एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते वेगळे राहत असल्याची माहितीही समोर आली आहे.
advertisement
2/9
विजय आणि संगीता यांच्या डिवोर्सची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विजयच्या अभिनय, सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/9
विजय आणि संगीता यांनी 27 वर्षांचा संसार केला. त्यांना दोन मुलं आहेत. दोघांची पहिली भेट कुठे झाली होती? दोघांची लव्ह स्टोरी देखील खूपच फिल्मी आहे.
advertisement
4/9
थलापती विजयचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. पण चाहते त्याला थलापती म्हणतात. विजयने अॅक्शनपासून ड्रामापर्यंत आणि अगदी इमोशन चित्रपटांमध्येही काम केले आहे. तुम्हाला माहिती आहे का की थलापती विजयने त्याच्या एका फॅनशी लग्न केलं होतं. संगीता ही विजयची फॅन होती.
advertisement
5/9
एखाद्या सिनेमाच्या कथेत घडावं असं विजय आणि संगीताची लव्ह स्ट्रोरी आहे.  विजयने वयाच्या 18 व्या वर्षी "नालया थीरपू" या त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. 1996 मध्ये विजय चेन्नईमध्ये एका चित्रपटाचं शूटींग करत होता. शूटिंग दरम्यान एक मुलगी त्याच्याकडे आणि त्याचं कौतुक केलं. त्याला अभिनंदन करत त्याच्याकडे ऑटोग्राफ मागितला. विजय तिच्याशी बोलला. त्यांनी सेटवर खूप गप्पा मारल्या. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून श्रीलंकेच्या एका उद्योगपतीची मुलगी संगीता सोर्नालिंगम होती.
advertisement
6/9
विजय आणि संगीता यांच्यात थोडंच बोलणं सुरू झालं होतं. विजयला कळले की त्याला संगीता आवडू लागली आहे. त्यानंतर त्याने तिला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. संगीताला आमंत्रण ऐकून आश्चर्य वाटलं. ती त्याच्या घरी गेली.
advertisement
7/9
संगीता त्याच्या घरी आल्यानंतर विजयने तिची त्याच्या पालकांशी ओळख करून दिली. तेव्हा विजयला समजलं की त्याला संगीता आवडतेय आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. जेवणानंतर त्यांनी संगीताला विचारले, "तू माझ्या मुलाशी लग्न करशील का?" संगीतालाही विजय आवडू लागला होता. तिने तिच्या घरी विचारलं आणि लगेच होकार दिला. विजय आणि संगीता जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.
advertisement
8/9
विजयने 25 ऑगस्ट 1999 रोजी संगीताशी लग्न केलं. विजय ख्रिश्चन आहे आणि संगीता तमिळ हिंदू आहे. हिंदू रीतिरिवाज आणि परंपरेनुसार दोघांचं लग्न झाले. चेन्नईमध्ये हे लग्न झाले. 200 मध्ये त्यांना जेसन संजय हा मुलगा झाला. त्यानंतर 2005 मध्ये मुलगी दिव्याचा जन्म झाला.
advertisement
9/9
संगीता सोर्नालिंगम ही एक व्यावसायिक महिला आणि एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. तिने कधीही तिची पार्श्वभूमी स्पष्टपणे सांगितली नाही. संगीता नेहमीच विजयच्या पाठिशी खंबीरपणे उभी होती. लग्नाआधी संगीता विजयच्या सेटवर यायची. दोघे तिथे एकत्र वेळ घालवायचे. संगीता विजयपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑटोग्राफ घ्यायला आली अन् पहिल्या नजरेतच आवडली, मग 27 वर्षे केला संसार; थलापति विजयची फिल्मी Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल