TRENDING:

Vastu Niyam: कारच्या डॅशबोर्डवर फक्त मूर्ती लावून उपयोग नाही; मालकांना हे नियमसुद्धा माहिती असायला हवे

Last Updated:
Vastu Niyam: आपल्या घरात आणि बाहेरही वास्तुशास्त्राचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. प्रत्येक गोष्ट वास्तूच्या नियमांनुसार असेल तर अडचणी दूर व्हायला मदत होते. घराप्रमाणेच आपल्या कारसाठी देखील वास्तुशास्त्रात काही खास टिप्स दिल्या आहेत. कारमध्ये काही ठराविक गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ती गाडी तुमच्यासाठी नशिबाची ठरू शकते. यामुळे प्रवासातील त्रास आणि अपघातांची भीतीही कमी होते असे मानले जाते. त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
1/6
कारच्या डॅशबोर्डवर फक्त मूर्ती लावून उपयोग नाही; मालकांना हे नियमही माहीत हवेत
कार घेताना लोक रंग, फिचर्स किंवा कंपनी याकडे लक्ष देतात, पण त्यानंतरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. वास्तू विज्ञानानुसार कारमध्ये कोणत्या गोष्टी असणं शुभ मानलं जातं, त्याविषयी आज थोडक्यात समजून घेऊ.
advertisement
2/6
गणपतीची मूर्ती - बहुतेक लोक कारमध्ये देवाच्या मूर्ती ठेवतात, पण वास्तू नुसार गणपतीची मूर्ती ठेवणं सर्वात उत्तम मानलं जातं. गणपतीला आपण 'विघ्नहर्ता' म्हणतो. कारमध्ये गणपतीची छोटी मूर्ती किंवा फोटो असेल, तर प्रवासात येणारी संकटं दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
advertisement
3/6
नॅचरल स्टोन्स आणि क्रिस्टल्स - वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये नैसर्गिक दगड (Natural Stones) किंवा क्रिस्टल्स ठेवणं खूप शुभ असतं. तुम्ही ते कारच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता. असं म्हणतात की, यामुळे पृथ्वी तत्व आणि कार यांच्यात एक प्रकारचा समतोल राहतो, जो तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवतो.
advertisement
4/6
चायनीज कॉईन्स - कारमध्ये चायनीज कॉईन्स (सिक्के) लटकवणं वास्तुशास्त्रात चांगलं मानलं जातं. हे कॉईन्स कारचं इंटिरिअर आणि रंग यांच्यात एक सकारात्मक ताळमेळ राखतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा गाडीच्या आत येत नाही.
advertisement
5/6
एसेंशियल ऑईल (Essential Oils) - प्रवासात तुमचं मन प्रसन्न राहणं खूप गरजेचं असतं. लॅव्हेंडर किंवा पिपरमिंट सारख्या एसेंशियल ऑईलचा वापर केल्याने मूड फ्रेश राहतो. याच्या सुगंधामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं आणि गाडी चालवताना एकाग्रता वाढते.
advertisement
6/6
मीठ - नकारात्मकता घालवण्यासाठी मीठ हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कारच्या सीटखाली एका कागदावर थोडं सैंधव मीठ ठेवल्याने सकारात्मकता वाढते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे मीठ वेळोवेळी बदलत राहा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vastu Niyam: कारच्या डॅशबोर्डवर फक्त मूर्ती लावून उपयोग नाही; मालकांना हे नियमसुद्धा माहिती असायला हवे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल