TRENDING:

Rinku Singh : एकीकडे वडिलांच निधन, दुसरीकडे वर्ल्ड कप, रिंकु सिंह काय करणार? मोठी अपडेट

Last Updated:
दरम्यान आता एकीकडे वडिलांच निधन झालं आहे, तर दुसरीकडे वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आहे.अशा परिस्थितीत रिंकु मॅच खेळणार की कुटुंबियांसोबत राहणार? असा मोठा प्रश्न उपस्थित होत होता.
advertisement
1/9
एकीकडे वडिलांच निधन, दुसरीकडे वर्ल्ड कप, रिंकु सिंह काय करणार? मोठी अपडेट
टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रिंकु सिंह याचे वडील खानचंद सिंह याचे आज निधन झाले आहे.
advertisement
2/9
रिंकूच्या वडिलांना फोर्थ स्टेजचा कॅन्सर होता. या आजाराशी लढता त्यांची झुंज अपयशी ठरली होती
advertisement
3/9
रिंकुचे वडील खानचंद सिंह यांचे आज नोएडातील यथार्थ हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. खानचंद सिंह हे 58 वर्षांचे होते आणि त्यांना फोर्थ स्टेजचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर ग्रेटर नोएडाच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरू होते.
advertisement
4/9
खानचंद सिंह यांची नुकतीच तब्येत खराब झाली होती. ज्यामुळे 21 फेब्रुवारी 2026 पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू होता.या उपचारा दरम्यान त्यांना व्हेंटीलेटरच्या सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता,अशी माहिती डॉ. सुनील कुमार यांनी सांगितले.
advertisement
5/9
खानचंद सिंह यांच ज्यावेळेस निधन झालं तेव्हा रिंकु सिंह टीम इंडियासोबत होता.टीम इंडियाने आदल्याच दिवशी झिम्बाबेचा पराभव केला होता.या सामन्यात रिंकु सिंहला संधी मिळाली नव्हती.पण मैदानात फिल्डींग करताना तो दिसला होता.त्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो घरी निघाला होता.
advertisement
6/9
आज त्याने घरी परतून वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता, या दरम्यान त्याच्या डोळ्यात अश्रू होते.
advertisement
7/9
दरम्यान आता एकीकडे वडिलांच निधन झालं आहे, तर दुसरीकडे वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आहे.अशा परिस्थितीत रिंकु मॅच खेळणार की कुटुंबियांसोबत राहणार? असा मोठा प्रश्न उपस्थित होत होता.पण आता यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
8/9
वडिलांच्या अंतिम विधीनंतर रिंकु शनिवारी कोलकत्तामध्ये टीम इंडियाशी जोडला जाणार आहे,अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी दिली आहे.
advertisement
9/9
वेस्टइंडिज विरूद्ध सामन्यात रिंकु परतणार असल्याने टीम इंडियाची ताकद वाढणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rinku Singh : एकीकडे वडिलांच निधन, दुसरीकडे वर्ल्ड कप, रिंकु सिंह काय करणार? मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल